NATO Chief Mark Rutte : मागच्या काही दिवसांपासून अमेरिका आणि युरोपियन युनियन यांच्यात तणाव वाढला आहे. त्यातच आता नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांनी, युरोप अमेरिकेशिवाय स्वतःचे रक्षण करू शकत नाही” असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांनी युरोपीय नेत्यांना इशारा देत ,”जर कोणी असा विचार करत असेल की युरोप किंवा युरोपीय संघ एकटे स्वतःचे रक्षण करू शकत तर ते “स्वप्नांच्या जगात” जगत आहे.असे देखील म्हटले आहे. अमेरिकेशिवाय सुरक्षा अशक्य NATO Chief Mark Rutte : ब्रुसेल्समध्ये युरोपियन युनियनच्या कायदेकर्त्यांना संबोधित करताना रुटे यांनी हा इशारा दिला. त्यांनी याविषयी बोलताना, “जर कोणाला वाटत असेल की युरोप अमेरिकेशिवाय स्वतःचे रक्षण करू शकतो, तर त्यांनी स्वप्न पाहत राहिले पाहिजे. ते अशक्य आहे.” असे म्हटले . तसेच युरोप आणि अमेरिकेला एकमेकांची गरज आहे. असेही म्हटले. NATO Chief Mark Rutte : अलिकडच्या आठवड्यात नाटोमधील तणाव वाढला आहे. हे मुख्यत्वे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांमुळे झाले आहे, ज्यामध्ये त्यांनी डेन्मार्कचा अर्ध-स्वायत्त प्रदेश असलेल्या ग्रीनलँडला जोडण्याची मागणी केली होती. ट्रम्पने ग्रीनलँडला पाठिंबा देणाऱ्या युरोपीय देशांवर नवीन शुल्क लादण्याची धमकी देखील दिली होती, जरी नंतर त्यांनी सुरुवातीच्या करारानंतर हा निर्णय मागे घेतला. रुटे यांनी या वाटाघाटींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असे म्हटले जाते. आर्टिकल ५ नाटोची सुरक्षा हमी काय आहे? नाटोच्या ३२ सदस्य देशांमध्ये आर्टिकल ५ हा एक महत्त्वाचा नियम आहे. याअंतर्गत, जर एका सदस्य देशावर हल्ला झाला तर इतर सर्व देश त्याला मदत करण्यास बांधील आहेत. ही नाटोची सर्वात मोठी ताकद मानली जाते. संरक्षण खर्च वाढवण्याचा करार, स्पेन वेगळे NATO Chief Mark Rutte : जुलैमध्ये द हेग येथे झालेल्या नाटो शिखर परिषदेत, युरोपीय देश आणि कॅनडा यांनी अमेरिकेच्या दबावाखाली संरक्षण खर्च वाढवण्यावर सहमती दर्शविली. स्पेन वगळता सर्व देशांनी पुढील १० वर्षांत संरक्षणावर अधिक खर्च करण्याचे वचन दिले. नाटो देशांनी २०३५ पर्यंत जीडीपीच्या ३.५% थेट संरक्षणावर आणि जीडीपीच्या १.५% सुरक्षा-संबंधित प्रणालींवर खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. हे जीडीपीच्या ५% होईल. तर आपल्याला १०% खर्च करावे लागतील मार्क रुटेने इशारा दिला की जर युरोप खरोखरच अमेरिकेशिवाय जगू इच्छित असेल तर ५% देखील पुरेसे ठरणार नाही. तो म्हणाला, “जर तुम्हाला एकटे जायचे असेल, तर तुम्हाला १०% खर्च करावा लागेल. शिवाय, तुम्हाला स्वतःची अणु क्षमता निर्माण करावी लागेल, ज्यासाठी अब्जावधी युरो खर्च येतील.” अमेरिकेच्या अणु छत्र्याशिवाय युरोप असुरक्षित रुटे म्हणाले की अमेरिकेशिवाय, युरोप त्याची सर्वात मोठी सुरक्षा – अमेरिकेची अणु सुरक्षा हमी गमावेल. तो म्हणाला, “जर अमेरिका अस्तित्वात नसेल, तर आपण आपल्या स्वातंत्र्याची शेवटची हमी गमावू. मग… शुभेच्छा.” असे म्हणत त्यांनी इशारा दिला आहे. हेही वाचा : India EU Trade Deal : युरोपियन युनियनसोबतच्या व्यापार करारामुळे देशात काय स्वस्त होईल? ; अंमलबजावणी कधी होणार ? वाचा