Video: अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये दुफळी! एकीकडे शोक, दुसरीकडे ‘ट्रम्प डान्स’चा जल्लोश

Young Iranians Celebrate Khamenei Death: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर देश दोन टोकांमध्ये विभागला गेला आहे. एकीकडे सरकारसमर्थक रस्त्यांवर उतरून अमेरिका व इस्रायलविरोधात बदल्याच्या घोषणा देत आहेत, तर दुसरीकडे तरुण पिढी आणि महिला सोशल मीडियावर ‘ट्रम्प डान्स’ रील्सद्वारे आनंद साजरा करत आहेत.
अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू-
इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका व इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात खामेनेई यांचा मृत्यू झाला. ही बातमी पसरताच तेहरान, कराज, इजेह आणि इतर शहरांमध्ये तरुणांनी रस्त्यांवर नृत्य केले, कार हॉर्न वाजवले आणि फटाके फोडले. अनेक महिलांनी हिजाब उतरवून नृत्य केले जे २०२२ च्या महसा अमिनी आंदोलनाची आठवण करून देणारे होते.
🚨 BREAKING: Iranian women are JAMMING to YMCA right now in the streets of Los Angeles, President Trump’s signature song
The crowd in support of Trump taking down the Iranian regime is absolutely huge, even in deep-blue LA
This is what WINNING looks like!pic.twitter.com/O8Jl4lENnh
— Eric Daugherty (@EricLDaugh) March 2, 2026
एका महिलेने खामेनेई यांचा फोटो जाळून त्यावर सिगारेट पेटवली आणि नृत्य केले. तिच्या पोस्टचे शीर्षक होते, “मी म्हटलं होतं ना, तुझ्या कबरीवर नाचेन?”
‘ट्रम्प डान्स’ ट्रेंड व्हायरल –
लॉस एंजेलिसमधील इराणी महिला ट्रम्प यांच्या आवडत्या ‘YMCA’ गाण्यावर नृत्य करताना दिसल्या. अनेक रील्समध्ये तरुणांनी ट्रम्प यांचे डान्स मूव्ह्ज कॉपी करत ‘थँक यू ट्रम्प’ अशा घोषणा दिल्या. २४ वर्षीय नाझनीन हिने ‘द गार्डियन’ला सांगितले, “बाहेरचे लोग समजू शकत नाहीत की या जुलमाखाली दबलेल्या इराणी जनतेला आज कसं वाटतंय.”
گفتم سر قبرتون میرقصیم نگفتم؟#KingRezaPahlavi pic.twitter.com/XkI3m7oYN3
— Morticia Addams 🇮🇷 (@melianouss) February 28, 2026
‘पहिल्यांदा सिगारेट ओढली, रात्रभर डोळ्याला डोळा नाही’ –
तेहरानची २० वर्षीय विद्यार्थिनी मिना म्हणाली, “मनात फक्त बदल्याची आग होती. आज ती इच्छा पूर्ण झाली.” रश्तमधील एका डॉक्टरने सांगितले, “पहिल्यांदाच सिगारेट ओढली. रात्रभर जागे राहिलो, थकवाही जाणवला नाही. हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम रात्र होती.”
Iranian women, upon receiving the news of the death of Iran’s lslamic regime religious leader Khamenei, celebrated by dancing.
— Azat (@AzatAlsalim) March 1, 2026
दुसरीकडे शोकसागर –
मात्र दुसऱ्या बाजूने शोकही तितकाच मोठा आहे. तेहरानच्या चौकांमध्ये हजारो लोक जमले. २१ वर्षीय हुसेन दादबख्श म्हणाला, “मी इस्लाम आणि माझ्या इमामसाठी जीव द्यायला तयार आहे. झायोनिस्ट आणि ट्रम्प यांना मोठी किंमत मोजावी लागेल.” शिराजमधील शिक्षिका अतौसा मिर्झादे यांनी मात्र वेगळी भीती व्यक्त केली, “इराकसारखी अराजकता आली तर काय होईल?”
A young Iranian woman cries tears of joy after hearing the news of Khamenei’s death.
Iranian women deserve freedom.
— Dr. Maalouf (@realMaalouf) March 1, 2026
४७ वर्षांचा राग आज उफाळला –
अभिनेत्री एलनाझ नोरौझी यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले, “४७ वर्षांची प्रतीक्षा होती… अल्लाहु अकबर… आमच्यासाठी ही सर्वात आनंदाची बातमी आहे.” २०२२ च्या आंदोलनात महसा अमिनी, सरीना इस्माइलझादे आणि निका शकरामी यांसारख्या हजारो तरुणांनी प्राण गमावले होते — आज या तरुण पिढीला हा त्यांचा बदला वाटतो आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणचे भवितव्य काय असेल, हा प्रश्न जगाच्या नजरा आपल्याकडे खेचत आहे.





