Irani Cup 2025 : अंशुल कंबोजच्या भेदक गोलंदाजीने विदर्भ जोमात, रेस्ट ऑफ इंडियासमोर ३६० धावांचे कठीण आव्हान!

Irani Cup 2025 Vidarbha Sets 360-Run Target : रणजी ट्रॉफी विजेता विदर्भाने इराणी कप फायनलमध्ये रेस्ट ऑफ इंडियाला विजयासाठी 360 धावांचे लक्ष्य दिले आहे. शनिवारी चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे लवकर थांबवण्यात आला, तत्पूर्वी विदर्भाने 30 धावांवर रेस्ट ऑफ इंडियाचे दोन विकेट्स काढून त्यांच्यावर दडपण आणले. विदर्भाने चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव 96/2 वरून पुढे सुरू केला आणि 94.1 षटकांत 232 धावांवर सर्वबाद झाला. पहिल्या डावातील 128 रनांच्या आघाडीमुळे यजमान विदर्भाला रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध मोठी आघाडी मिळाली.
अंशुल कंबोजने सलग तीन षटकांत घेतल्या 3 विकेट्स –
Stumps on Day 4!
Rest of India have lost their openers in their chase of 361 🎯
Currently they are 30/2 with captain Rajat Patidar and Ishan Kishan at the crease 👍
Updates ▶️ https://t.co/AhTUqMmjwm@IDFCFIRSTBank | #IraniCup pic.twitter.com/roWhocdvhV
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 4, 2025
वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने दिवसाच्या सुरुवातीला सलग तीन षटकांत तीन विकेट्स घेत शानदार कामगिरी केली. त्याने दिवसाच्या दुसऱ्या चेंडूवर कालचा नाबाद फलंदाज दानिश मालेवार (16) याला बाद केले. पुढील षटकात यश राठोड (5) आणि त्यानंतर ध्रुव शौरी (27) याला पायचीत करत विदर्भाचा डाव 105/5 असा अडचणीत आणला. कर्णधार अक्षय वाडकरने 36 धावांची (125 चेंडू) खेळत संयमी खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने हर्ष दुबे (29) सोबत 39 आणि दर्शन नालकंडे (35) सोबत 35 धावांच्या उपयुक्त भागीदाऱ्या करत डावाला आधार दिला.
रेस्ट ऑफ इंडियाची आक्रमकता फार टिकली नाही –
रेस्ट ऑफ इंडियासाठी गुरनूर बरार, सारांश जैन आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर कंबोजने 34 धावांत चार विकेट्स घेत गोलंदाजीचे नेतृत्व केले. रेस्ट ऑफ इंडियाने 360 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग आक्रमकपणे सुरू केला. सलामीवीर अभिमन्यु ईश्वरनने सलग दोन चौकार ठोकले, तर आर्यन जुयालनेही एक चौकार लगावला. हर्ष दुबेच्या पहिल्याच षटकात 13 धावा निघाल्या. मात्र, ही आक्रमकता फार काळ टिकली नाही.
हेही वाचा – IND vs PAK : सोनी लिव्ह नाही, ‘इथे’ पाहता येणारा भारत-पाकचा थरार, सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही
रेस्ट ऑफ इंडियाला विजयासाठी आणखी 331 धावांची गरज
आदित्य ठाकरेने चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जुयालला (6) बाद केले, तर दुबेने सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ईश्वरनला (17) पायचीत केले. रेस्ट ऑफ इंडिया 24/2 अशा बिकट परिस्थितीत असताना पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी ईशान किशन (5) आणि कर्णधार रजत पाटीदार (2) नाबाद होते. रेस्ट ऑफ इंडियाला विजयासाठी आणखी 331 धावांची गरज आहे, तर त्यांच्याकडे आठ विकेट्स शिल्लक आहेत. विदर्भाला त्यांची तिसरी इरानी कप ट्रॉफी जिंकण्यापासून रोखण्यासाठी रेस्ट ऑफ इंडियाला विशेष कामगिरी करावी लागेल.





