इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा भारताबाबतचा दृष्टिकोन काय ? ; दोन्ही देशांतील संबंधांवर किती परिणाम होणार ?

Iran New President । इब्राहिम रायसी यांच्यानंतर इराणला नवीन राष्ट्राध्यक्ष मिळाले आहेत. मसूद पेझेश्कियान यांनी शनिवारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांनी सईद जलिली यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. भारताच्या दृष्टिकोनातून इराणचे संबंध पाहिल्यास राष्ट्राध्यक्ष रायसी यांच्या काळात इराणशी चांगली मैत्री होती. इराणच्या नवीन राष्ट्राध्यक्षांबद्दल बोलायचे तर ते अगदी सामान्य पार्श्वभूमीतून आले आहेत.
इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही यांनी निवडणूक निकाल येण्यापूर्वीच इराणची भूमिका मांडली होती. सत्तेत कोणीही आले तरी इराण आणि भारताच्या परराष्ट्र धोरणात कोणताही बदल होणार नाही, असे ते म्हणाले होते. इब्राहिम रायसी यांच्या मृत्यूपूर्वीच चाबहार बंदराबाबत भारतासोबत करार करण्यात आला होता.
इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही यांनी, “आम्हाला नवे राष्ट्रपती मिळाले आहेत, मात्र इराणच्या परराष्ट्र धोरण आणि अंतर्गत धोरणात कोणताही बदल होणार नाही. दोन्ही चर्चेत इराणची शक्ती अंतर्गत आणि बाहेरून मजबूत करण्यावर भर देण्यात आलाय” असे त्यांनी म्हटले आहे.
भारत-इराण संबंधात कोणताही बदल होणार नाही Iran New President ।
भारत आणि इराणमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या मजबूत आर्थिक संबंध आहेत. मसूद पेझेश्कियान राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर हे संबंध आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने चाबहार बंदरावर लक्ष केंद्रित केले जाईल. हा प्रकल्प असा आहे ज्यासाठी भारताने मोठी गुंतवणूक केली आहे. त्याच वेळी, इराणच्या सामान्य परराष्ट्र धोरणात बदल होण्याची शक्यता नाही, असे तज्ञांचे मत आहे, पुढे कोणाचीही सत्ता आली तरी. मात्र, नव्या अध्यक्षांची कार्यशैली वेगळी असू शकते.
रायसी यांच्या निधनानंतर निवडणुका झाल्या Iran New President ।
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे १९ मे रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. यानंतर देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका जाहीर झाल्या. यापूर्वी इराणमध्ये या वर्षी फेब्रुवारीमध्ये निवडणूक झाली होती, ज्यामध्ये रायसी पुन्हा देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले होते.





