Iran Israel War : अमेरिकेतील निवडणुकीच्या अगोदर मोठा हल्ला करणार, इराणने दिला इस्रायलला इशारा…

तेहरान – इस्रायल आणि इराणमधील तणाव लक्षणीयरित्या वाढला आहे. दोन्ही देश एकमेकांना उघड आव्हाने देत आहेत. गेल्या 1 महिन्यात दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले आहेत. 25 ऑक्टोबरच्या रात्री 100 इस्रायली लढाऊ विमाने शनिवारी पहाटे इराणच्या आकाशात घुसली आणि वेगाने बॉम्बहल्ला केला होता. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी इराण इस्रायलवर मोठा हल्ला करू शकतो, अशी धमकी इराणने इस्रायलला दिली आहे.
मात्र, इस्रायल आणि अमेरिका या दोघांनीही इराणला पुन्हा इस्रायलवर हल्ला करण्याची चूक करू नये, असा इशारा दिला आहे. इराणने इस्रायलच्या भूमीवर एकही क्षेपणास्त्र डागले तर त्याचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागू शकतात, असेही इस्रायलने म्हटले आहे. टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इराणच्या एका अधिकाऱ्याने दावा केला आहे की, इराण 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी निर्णायक आणि जोरदार हल्ला करण्याची तयारी करत आहे.
1 ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर 180 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. बहुतेक क्षेपणास्त्रे इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेने नष्ट केली. यानंतर इस्रायलने इराणला गंभीर परिणामांचा इशारा दिला होता. इराणवर हवाई हल्ल्यानंतर इस्रायलला आता प्रत्युत्तराची भीती वाटत आहे.
US Election 2024: अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीकडे संपूर्ण जगाच्या नजरा; 5 नोव्हेंबरला निकाल
इस्रायली न्यूज आउटलेट जेरुसलेम पोस्टने राष्ट्रीय सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की इराण इस्रायलवर हल्ला करेल अशी भीती इस्रायलला वाटत आहे. इस्रायलने डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे फारसे नुकसान झाले नसल्याचा दावा इराणने केला आहे. पण, 25 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यात चार इराणी सैनिक मारले गेल्याचा इस्रायलचा दावा आहे.





