वॉशिंग्टन – अमेरिकेत पुढील सात दिवसांमध्ये ४७ व्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने कमला हॅरिस, यांना तर रिपब्लिकन पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणूकीसाठी आता केवळ सहा दिवस राहिले असून ५ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
अमेरिकन जनता आपला नवा राष्ट्राध्यक्ष कोणाला निवडून देणार याकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. इतर देशांप्रमाणे भारतही व्हाईट हाऊसच्या शर्यतीवर बारीक नजर ठेवून आहे.
कमला हॅरिस अर्ध्या भारतीय आहेत. त्यांचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये झाला. त्यांची आई तामिळनाडूची होती आणि वडील जमैकाचे होते. तिचे पालक अमेरिकेत भेटले आणि लग्न केले. नंतर ते वेगळे झाले आणि घटस्फोट घेतला. कमला हॅरि यांची आई त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी अनेक वेळा चेन्नईला आली होती.
कमला हॅरिस यांना भारतीय डोसे आवडतात हे फार कमी लोकांना माहीत आहे. पण याचा अर्थ असा नाही की हॅरिस यांना भारतीय परंपरा आणि भारतीय जागतिक दृष्टिकोनाची फारशी जाण आहे. त्यांची भूतकाळातील विधाने आणि अनेक मुद्यांवरची भूमिका पाहता ते खरोखरच भारत समर्थक आहेत असे म्हणता येणार नाही.