“युरेनियम परत करा, नाहीतर…” ; युद्ध संपल्यानंतरही इस्रायलचा इराणला अल्टिमेटम

Iran-Israel Conflict। इराण आणि इस्रायल यांच्यात सुरु असणारे युद्ध काही दिवसापूर्वीच संपले आहे. मात्र या युद्धबंदीनंतरही इस्रायलने इराणला कडक इशारा दिला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी, इराणला धोकादायक पातळीवर घेऊन जाणाऱ्या युरेनियमला आम्हाला परत करावे लागेल. हेच युरेनियम आहे ज्यापासून अणुबॉम्ब बनवले जातात.” असे म्हणत इराणला अल्टिमेटम दिला आहे. काट्झ यांनी स्पष्टपणे,”अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणला संदेश दिला आहे की त्यांना त्यांचे समृद्ध युरेनियम परत करावे लागेल” असे सांगितले आहे.
इराणकडे अणुबॉम्ब नाही Iran-Israel Conflict।
काट्झ यांनी एका मुलाखतीत सांगितले की, इस्रायलने इराणवर केलेले अलिकडचे हल्ले त्यांची अणु क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशाने होते. त्यांनी असा दावा केला की,”आता इराणकडे अणुबॉम्बसाठी युरेनियमचे घन स्वरूपात रूपांतर करण्याचा कोणताही मार्ग उरलेला नाही, कारण ती हस्तांतरण सुविधा देखील नष्ट झाली आहे.
इस्रायलला इराणचे संपूर्ण युरेनियम साठे कुठे आहेत हे माहित नाही?
संरक्षण मंत्री काट्झ यांनी असेही कबूल केले की,”इस्रायलला माहित नाही की इराणने त्यांचे सर्व समृद्ध युरेनियम कुठे लपवले आहे. यामुळे इराण गुप्तपणे त्यांच्या अणुयुद्धाची तयारी करत नसल्याची चिंता आणखी वाढली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, युरोपियन गुप्तचर तज्ञांचा असा विश्वास आहे की इराणच्या मुख्य अणु केंद्रांवर अमेरिकेने हल्ले केले असूनही, त्यांचे समृद्ध युरेनियम साठे अजूनही मोठ्या प्रमाणात सुरक्षित आहेत.
अहवालात म्हटले आहे की,”अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वी फोर्डोजवळ ट्रकची हालचाल दिसून आली होती, ज्यामुळे इराणने तेथून आधीच युरेनियम काढून टाकल्याचा संशय निर्माण होतो.” युरोपीय देशांचा असाही विश्वास आहे की इराणकडे सुमारे ४०८ किलो उच्च दर्जाचे युरेनियम आहे, जे शस्त्रे बनवण्यासाठी पुरेसे आहे आणि अलीकडेच फोर्डो केंद्रात ते उपस्थित नव्हते.
इस्रायलला खमेनींना मारायचे होते
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी एक मोठा खुलासा केला आहे की इराणशी झालेल्या अलीकडील संघर्षादरम्यान इस्रायली सैन्याने इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांना मारण्याची योजना आखली होती. तथापि, त्यांनी हे देखील मान्य केले की युद्धादरम्यान ही योजना अंमलात आणण्याची अशी कोणतीही संधी नव्हती.
अमेरिकेकडून परवानगी आली का? Iran-Israel Conflict।
जेव्हा काट्झ यांना विचारण्यात आले की इस्रायलने अशा कारवाईसाठी अमेरिकेकडून परवानगी घेतली होती का, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की अशा प्रकरणांमध्ये इस्रायलला कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. ते म्हणाले की खमेनींना लक्ष्य करण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला होता, परंतु तो सुरक्षित बंकरमध्ये लपताच, त्याला शोधणे कठीण झाले आणि कारवाई करता आली नाही.





