तिघांना फाशी तर ७०० जणांना अटक ; इराणमध्ये मोसादच्या ‘अंडरकव्हर एजंट्स’विरुद्ध कारवाई

Iran-Israel ceasefire। इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी झाली असली तरी तणाव कमी झालेला नाही. इराणने आज सकाळी इस्रायलसाठी हेरगिरी आणि हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली तीन जणांना फाशी दिली.
एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, इराणने जारी केलेल्या निवेदनानुसार, इद्रिस अली, आझाद शोजाई आणि रसूल अहमद रसूल यांनी हत्येसाठी वापरलेली उपकरणे इराणमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील तिन्ही आरोपींविरुद्ध खटला चालवण्यात आला आणि बुधवारी सकाळी उर्मिया शहरात शिक्षा म्हणून त्यांना फाशी देण्यात आली.
कुठे देण्यात आली फाशी ?
उर्मिया हे इराणचे वायव्येकडील शहर आहे, जे तुर्कीयेच्या सीमेजवळ आहे. फाशीची पुष्टी करताना, इराणी माध्यमांनी निळ्या तुरुंगाच्या गणवेशातील तिन्ही आरोपींचे फोटो देखील प्रसिद्ध केले आहेत. मात्र, इराणने असे पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ नाही. इराण वारंवार इस्रायल आणि इतर परदेशी गुप्तचर संस्थांसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून लोकांना अटक करतो आणि मृत्युदंडाची शिक्षा जाहीर करतो.
इराणची जलद कारवाई Iran-Israel ceasefire।
१३ जून २०२५ रोजी इराण आणि इस्रायलमधील युद्ध सुरू झाल्यानंतर, इराणने इस्रायलसाठी काम करणाऱ्यांवर जलद आणि कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्याच क्रमाने, काही आरोपींना रविवारी आणि सोमवारीही फाशी देण्यात आली.
इराणने १२ दिवसांच्या युद्धात ७०० लोकांना अटक केली
त्याच वेळी, अलिकडच्या १२ दिवसांच्या इराण-इस्रायल युद्धादरम्यान इस्रायलशी संबंध असल्याच्या आरोपाखाली इराणने ७०० लोकांना अटक केली आहे. ही माहिती इराणच्या राज्य समर्थित मीडिया एजन्सीने दिली.
गुप्त माहिती लीक केल्याचा आरोप Iran-Israel ceasefire।
वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, या सर्वांवर इस्रायली गुप्तचर संस्था ‘मोसाद’शी संबंधित असल्याचा, गुप्त माहिती शेअर करण्याचा आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्यात मदत करण्याचा आरोप आहे. इराणचे म्हणणे आहे की यातील अनेक आरोपींची चौकशी सुरू आहे आणि त्यापैकी काहींना लवकरच शिक्षा होऊ शकते. याआधीही, इराणने आरोप केला होता की युद्धादरम्यान अनेक अंतर्गत नेटवर्क इस्रायलसाठी काम करत होते आणि त्यांना पकडण्यात आले होते.





