Iran hits Kuwait refinery : इराणने आज सकाळी कुवेतच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पांवर मारा केला. इस्रायलमध्येही क्षेपणास्त्रांचा मारा झाला. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेसाठी सायरन वाजवले गेले. दुसरीकडे इराणची राजधानी तेहरानमध्ये इस्रायली हल्ल्यामुळे स्फोटांचे अनेक आवाज घुमले. युद्ध सुरू झाल्याला ३ आठवडे पुर्ण होत असताना आणि पर्शियन नववर्ष सुरू होत असताना युद्धाची तीव्रता अधिक वाढली आहे. कुवेतमधील मिना अल-अहमद तेल शुद्धिकरण प्रकल्पाला इराणी ड्रोनच्या हल्ल्यामुळे आग लागली. कुवेतमधील तीन मोठ्या तेल शुद्धिकरण प्रकल्पांवरील हा मोठा हल्ला होता. या तेल प्रकल्पातून दिवसाला ७ लाख ३० हजार बॅरल तेलावर प्रक्रिया केली जाते. गुरुवारी झालेल्या इराणने अशाच प्रकारे केलेल्या हल्ल्यात या प्रकल्पाचे नुकसान झाले होते. मोजतबा खामेनींचा शत्रू देशांना इशारा : Iran hits Kuwait refinery इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा अली खामेनी यांनी आपल्या शत्रूंना पुन्हा इशारा दिला आहे. इराणच्या शत्रूंना आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल, असे ते म्हणाले. सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्यापासून खामेनी उघडपणे कोठेही दिसलेले नाहीत. आज देखील त्यांनी आपले निवेदन इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कीयान यांच्याकडे पाठवून दिले. इस्रायलने इराणच्या गुप्तचर मंत्रालयाचे मंत्री इस्माइल खातिब यांना मारल्यानंतर खामेनी यांनी हा इशारा दिला. Iran hits Kuwait refinery Iran War दुबईमधअये स्फोट, बहरिनमधअये गोदामाला आग : Iran hits Kuwait refinery दुबईमधअये हवाई संरक्षण प्रणालीने हवेतच ड्रोन पाडल्यामुळे स्फोटांचे आवाज घुमले. ईद उल-फित्रच्या निमित्ताने लोक मशिदीमध्ये प्रार्थनेसाठी एकत्र आले असताना हे स्फोट झाले. बहरिनमध्ये पाडलेल्या एका प्रोजेक्टाईलच्या अवशेषांमुळे एका गोदामाला आग लागली. सौदी अरेबियानेही अनेक ड्रोन पाडली. सौदीतील तेल समृद्ध इस्टर्न प्रांताला लक्ष्य करण्यासाठी इराणने ही ड्रोन डागली होती. आदल्याच दिवशी इराणने इस्रायलच्या साऊथ पार्समध्ये डझनभर क्षेपणास्त्रे डागली होती. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे उत्पादन सुरूच : Iran hits Kuwait refinery आता बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे तयार करण्याची इराणची क्षमता संपुष्टात आली असल्याचा दावाही नेतान्याहू यांनी केला. पण अजूनही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे उत्पादन केले जात असल्याचे रिव्होल्युशनरी गार्डने म्हटले आहे. हे उत्पादन जोरात सुरू आहे आणि साठ्याचा काही प्रश्न नाही, असे रिव्होल्युशनरी गार्डचे प्रवक्ते अली मोहम्मद नईनी यांनी सांगितले. जोपर्यंत इराणवरून युद्धाचे सावट हटत नाही, तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहिल, असे त्यांनी म्हटले होते. मात्र आज सकाळीच नईनी हेच हवाई हल्ल्यात मारले गेल्याचे इराणी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. जगभर उर्जा संकट झाले गडद : Iran hits Kuwait refinery अमेलरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विनंतीनुसार गॅस प्रकल्पांवरील हल्ले थांबवणार असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे. गॅस प्रकल्पांवरील इराणच्या हल्ल्यांमुळे गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. म्हणून हे हल्ले थांबवण्याची विनंत ट्रम्प यांनी केली होती. आखाती देशांमध्ये इराणचे हल्ले सुरू असताना दुसरीकडे इराण होर्मूझच्या सामुद्रधुनीमध्ये तेल आणि गॅसची वाहतूक करणाऱ्या मालवाहू जहाजांवरचे हल्लेही इराणने वाढवले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडची किंमत प्रति बॅरल ११९ डॉलरपर्यंत पोचली आहे. गुरुवारी ही किंमत १०७ डॉलर इतकी होती. इस्रायलमध्ये स्फोट आणि सायरनचे आवाज : शुक्रवारी पहाटे जेरुसलेम आणि उत्तर इस्रायलमध्ये सायरन आणि पाठोपाठ स्फोटांचे आवाज घुमले. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेसाठी भूमिगत बंकरमध्ये धाव घेतली. मात्र कोठेही जीवितहानीचे वृत्त नाही. इराणमध्ये नौरोझ आणि पर्शियन नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असताना तेहरानमध्येही अशाच प्रकारे स्फोट झाले. पण तेथील तपशीलही उपलब्ध झालेला नाही. इस्रायलने लेबनॉनमध्ये इराणचा पाठिंबा असलेल्या हिज्बुल्लाहवरही हल्ले केले. आज शेजारीत सीरियामध्येही हल्ले झाले. दक्षिणेकडील स्वेदा प्रांतात अल्पसंख्य द्रूझ समुदायावर हे हल्ले केल्याचे इराणी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. पुर्वी द्रूझ समुदायाच्या रक्षणासाठी इस्रायलने सीरियामध्ये लष्करी हस्तक्षेप केला होता. यूएईमध्ये हिज्बुल्लाहशी संबंधित ५ जणांना अटक : हिज्बुल्लाहकडून चालवल्या जाणाऱ्या नेटवर्कशी संबंधित ५ जणांना युएईमध्ये अटक करण्यात आली. देशाच्या आर्थिक स्थैर्याला धोकादायक आर्थिक योजना राबवत असल्याच्या आरोपावरून ही कारवाई केली गेली. अमिरातीतील सरकारी वृत्तसंस्थेने ५ व्यक्तींचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. मात्र या व्यक्तींची ओळख उघड केली गेलेली नाही. हे नेटवर्क हिज्बुल्लाहच्यावतीने मनी लॉन्डरिगं करण्यात गुंतलेले होते, असेही या वृत्तात म्हटले आहे.