Transfers of IPS Officer : पुण्यातील 2 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बदली
राज्यातील पोलिस प्रशासनात महत्त्वाच्या बदल्या (Transfers of IPS Officer) जाहीर करण्यात आल्या असून, पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांची सातारा जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Transfers of IPS Officer : राज्यातील पोलिस प्रशासनात महत्त्वाच्या बदल्या (Transfers of IPS Officer) जाहीर करण्यात आल्या असून, पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांची सातारा जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या बळकटीकरणाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पिंगळे यांनी पुणे गुन्हे शाखेत कार्यरत असताना (Transfers of IPS Officer) अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
संघटित गुन्हेगारीविरोधातील कारवायांमध्ये त्यांचा ठसा उमटला असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा साताऱ्यातील पोलिस यंत्रणेला होणार आहे.
दरम्यान, पुणे शहरातीलच पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची वाशीम जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती (Transfers of IPS Officer) करण्यात आली आहे. शिंदे यांनीही विविध विभागांत काम करताना कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.






