IPL Final 2023 GT vs CSK Live : चेन्नईचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या..दोन्ही संघाचे प्लेइंग-11

अहमदाबाद :- आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत आज गतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना चार वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जशी होत आहे. हा सामना रविवारीच होणार होता. मात्र, 28 मेचा दिवस पावसाने वाया गेला. आता हा सामना आज राखीव दिवशी खेळला जात आहे.
चेन्नई vs गुजरात याच्यांतील सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा(टाॅस) कौल हा चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूनं लागला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धोनीने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
दुसरीकडं गुजरातचा कर्णधार हार्दिक म्हणाला, जो संघ चांगला खेळेल त्याला ट्रॉफी मिळेल. तसेच आम्ही संघात कोणताही बदल केलेला नाही.
दोन्ही संघाचे प्लेइंग-11 खालीलप्रमाणे –
गुजरात टायटन्स: ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.
चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), दीपक चहर, मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, महेश टेकशाना.
दरम्यान, चेन्नई आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत एकूण चार सामने झाले आहेत. यापैकी गुजरातने तीन आणि चेन्नईने केवळ एकच सामना जिंकला आहे. गेल्या मोसमात या दोघांमध्ये दोन सामने झाले, त्या दोन्हीमध्ये गुजरात संघाने बाजी मारली. त्याचबरोबर या मोसमात दोन सामने खेळले गेले.मोसमातील सलामीच्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आले होते, ज्यात हार्दिकच्या संघाने विजय मिळवला होता. त्याचवेळी क्वालिफायर-1 मध्ये चेन्नईने गुजरातचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.





