IPL Auction Goa : आयपीएल ऑक्शनबाबत BCCI चा सर्वात मोठा निर्णय! परदेश दौरा संपला; ३ वर्षांनंतर ‘या’ शहरात होणार खेळाडूंचा लिलाव
IPL Auction Goa : गेल्या तीन वर्षांपासून आयपीएल लिलाव भारताबाहेर परदेशात आयोजित केला जात होता; मात्र यंदा बीसीसीआयने लिलाव मायदेशातच घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

IPL Auction Returns To India Goa To Host December Event BCCI Secretary Devajit Saikia Update : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) आगामी हंगामाच्या जोरदार तयारीदरम्यान खेळाडूंच्या लिलावाबाबत (IPL Auction) एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यावर्षी आयपीएल २०२७ चा बहुप्रतिक्षित लिलाव डिसेंबर महिन्यात गोव्यात आयोजित केला जाणार आहे. बीसीसीआयचे (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी ही अधिकृत माहिती दिली आहे. गेल्या तीन वर्षांपासून आयपीएल लिलाव भारताबाहेर परदेशात आयोजित केला जात होता; मात्र यंदा बीसीसीआयने लिलाव मायदेशातच घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
तीन वर्षांनंतर मायदेशात परतावा; दुबई-सौदीनंतर आता गोव्यात थरार!
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले की, मागील तीन आयपीएल लिलाव सौदी अरेबिया, दुबई आणि अबू धाबी येथे पार पडले होते. मात्र, भारतीय चाहत्यांचा उत्साह आणि लॉजिस्टिक्स लक्षात घेता यावेळी डिसेंबर महिन्यात गोव्यात हा महालिलाव रंगणार आहे. त्यामुळे जगभरातील क्रिकेट फ्रँचायझी आणि दिग्गजांची मांदियाळी आता गोव्याच्या किनाऱ्यावर रंगताना पाहायला मिळेल.
इंडिया ‘ए’ विरुद्ध ऑस्ट्रेलिया ‘ए’ सामने मोहालीला हलवले!
IPL auction to be held in Goa in mid December, says Devajit Saikia. pic.twitter.com/arDDm7Dyoi
— News Arena India (@NewsArenaIndia) September 23, 2026
लिलावाव्यतिरिक्त सैकिया यांनी महिला क्रिकेटबाबतही महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. भारत ‘ए’ महिला आणि ऑस्ट्रेलिया ‘ए’ महिला संघांमधील आगामी टी-२० सामने धरमशाला येथून मोहालीला हलवण्यात आले आहेत. धरमशालामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडणारा पाऊस आणि खराब हवामानामुळे खेळात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी बीसीसीआयने खबरदारीचा उपाय म्हणून हे सामने मोहालीत हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत-जपान ऐतिहासिक सामना; जय शाह यांच्या पुढाकाराने क्रिकेट डिप्लोमसी!
Arun Dhumal (IPL chairman) to PTI about IPL 2027 mini-auction:
“We have finalised Goa. The likely dates are December 15 to 16.”
One-day mini-auction (not mega).
Last mini of the 2023–27 cycle.
Back in India after 3 overseas:
Dubai → Jeddah (mega) → Abu DhabiLast India… pic.twitter.com/F4tSqT5lSf
— Cricket Hub (@Anurag9793) September 23, 2026
भारत आणि जपान यांच्यात नुकत्याच झालेल्या ऐतिहासिक टी-२० सामन्यावर बोलताना सैकिया म्हणाले, “हा केवळ एका सामन्यातील विजय नसून दोन्ही देशांमधील क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे.” आयसीसी (ICC) चेअरमन जय शाह यांच्या पुढाकाराने एडिनबर्गमधील चर्चेनंतर या सामन्याची पायाभरणी झाली होती. जपानमध्ये क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी आणि खेळ नव्या सीमांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही भागीदारी अत्यंत ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





