IPL Auction 2026 : CSK ने युवा खेळाडूंसाठी उघडली तिजोरी! प्रशांत-कार्तिक ठरले IPL इतिहासातील सर्वात महागडे अनकॅप्ड भारतीय

Most expensive uncapped Indian players in IPL Auction 2026 : अबू धाबी येथील आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये दोन युवा भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या (अनकॅप्ड) प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मावर मोठी बोली लागली आणि ते आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे भारतीय ‘अनकॅप्ड’ खेळाडू ठरले. या दोन्ही खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्स संघाने प्रत्येकी १४.२० कोटी रुपये मोजले.
प्रशांत वीरसाठी दिसली जबरदस्त चुरस –
उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रशांत वीर याच्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळाली. दोन्ही फ्रँचायझींनी त्याला आपल्या संघात घेण्यासाठी जोरदार बोली लावली, परंतु अखेरीस सीएसकेने बाजी मारली. प्रशांत वीरला १४ कोटी २० लाख रुपये या मोठ्या किमतीत सीएसकेने विकत घेतले. या खरेदीसह, प्रशांत वीर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे.
Prashant Veer earns BIG! ✨💛
A staggering INR 14.2 Crore for the all-rounder as he joins @ChennaiIPL 🤝#TATAIPL | #TATAIPLAuction pic.twitter.com/TOOwJ5jG4J
— IndianPremierLeague (@IPL) December 16, 2025
कार्तिक शर्मालाही लागली विक्रमी बोली –
The uncapped talents continue to shine in the #TATAIPLAuction 😎
A jaw-dropping bid of INR 14.2 Crore for Kartik Sharma 💰
He will feature in @ChennaiIPL in #TATAIPL 2026 💛 pic.twitter.com/l5fH3ONspW
— IndianPremierLeague (@IPL) December 16, 2025
प्रशांत वीरसह, यष्टिरक्षक-फलंदाज कार्तिक शर्मा यालाही तितकीच म्हणजेच १४ कोटी २० लाख रुपये किंमत मिळाली. राजस्थानसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या कार्तिकलाही चेन्नई सुपर किंग्सनेच आपल्या संघात सामील केले. कार्तिकसाठी मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांनीही बोली लावली होती. मात्र, सीएसकेने त्यांना मागे टाकत कार्तिकला विकत घेतले, ज्यामुळे तोही या सर्वात महागडा भारतीय अनकॅप्ड खेळाडू ठरला.
हेही वाचा – IPL Auction 2026 : मथीशा पथिरानाने रचला इतिहास! IPL इतिहासातील ठरला सर्वात महागडा श्रीलंकन खेळाडू
अशा प्रकारे आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या दोन्ही खेळाडूंनी इतिहास रचला आहे. कोणत्याही ‘अनकॅप्ड’ भारतीय खेळाडूला आतापर्यंत इतकी मोठी रक्कम मिळाली नव्हती. तत्पूर्वी या लिलावासाठी सर्वाधिक पर्स असलेल्या केकेआरने कॅमेरून ग्रीनला आपल्या संघात घेण्यासाठी तब्बल २५ कोटी २० लाख रुपये खर्च केले. ज्यामुळे आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला. त्याचबरोबर केकेआरने मथीशा पथिरानाला १८ कोटी रुपये देऊन त्या आयपीएलमधील सर्वात महागडा श्रीलंकन खेळाडू म्हणून शिक्कामोर्तब केला





