IPL Auction 2024 Gujarat Titans bought Shahrukh Khan : आयपीएल लिलावात गुजरात टायटन्सने शाहरुख खानला 7.40 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. शाहरुख खानची मूळ किंमत फक्त 40 लाख रुपये होती, परंतु गुजरात टायटन्सने त्याला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी 7.40 कोटी रुपये खर्च केले. वास्तविक, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात शाहरुख खानसाठी जोरदार बोली युद्ध सुरू होते, परंतु अखेरीस, गुजरात टायटन्सने शाहरुख खानला विकत घेतले.
पंजाब किंग्जने शाहरुख खानसाठी पहिली बोली लावली. यानंतर गुजरात टायटन्सने प्रवेश केला. त्यानंतर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जने शाहरुख खानसाठी बोली लावली. गुजरात टायटन्सने 7.40 कोटी रुपये खर्च करून शाहरुख खानचा आपल्या संघात समावेश केला. अशा प्रकारे शाहरुख खानला मूळ किंमतीपेक्षा 18.5 पट जास्त पैसे मिळाले. यापूर्वी शाहरुख खान पंजाब किंग्जचा भाग होता, मात्र अलीकडेच पंजाब किंग्जने शाहरुख खानला रिलीज केले होते.
प्रत्येक वेळी लिलावात शाहरुख खानवर झालाय पैशांचा पाऊस…
शाहरुख खान प्रथमच आयपीएल 2021 मध्ये खेळला. आयपीएल 2021 च्या लिलावात पंजाब किंग्जने शाहरुख खानला 5.25 कोटी रुपयांना विकत घेतले. यानंतर आयपीएल 2022 च्या लिलावात पंजाब किंग्जने शाहरुख खानला 9 कोटी रुपयांना जोडले. मात्र यावेळी प्रीती झिंटाची टीम शाहरुख खानला खरेदी करण्यात अपयशी ठरली. त्यानंतर आता शाहरुख खान गुजरात टायटन्सच्या जर्सीत दिसणार आहे.
शाहरुख खानची आयपीएलमधील कामगिरी…
शाहरुखने आतापर्यंत आयपीएलमधील सर्व सामने पंजाबसाठी खेळले आहेत. त्याने 33 सामन्यात 20.29 च्या सरासरीने 426 धावा केल्या आहेत. शाहरुखचा स्ट्राईक रेट 134.81 आहे. आयपीएलमध्ये त्याने एकही अर्धशतक झळकावले नाही. त्याने 26 चौकार आणि 28 षटकार मारले आहेत.