IPL 2023 – इंडियन प्रीमियर लीग ( IPL ) म्हणजे आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. या स्पर्धेच्या प्रत्येक हंगामाला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस या स्पर्धेचे महत्वही वाढत चालले आहे. जगभरातील अनेक क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक असतात. स्पर्धेच्या २०२३च्या १५ व्या हंगामात देखील मोठा जल्लोष पाहायला मिळणार आहे. दरम्यान, आयपीएल स्पर्धेच्या पुढील हंगामासाठी काही नवीन नियमांचा समावेश करण्यात येणार आहे.
भारतीय क्रिकेटरचा सुपर मार्केटमध्ये राडा; कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल!
शुक्रवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार आयपीएलने २०२३ ( IPL 2023 ) हंगामासाठी प्रत्येक संघाला सामन्यादरम्यान खेळाडूची बदली करता येणार आहे. या नव्या नियमाबद्दलची माहिती आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये ‘नवा हंगाम, नवा नियम’ असे लिहिले आहे. सामन्यादरम्यान बदली खेळाडू खेळण्याचा नियम बीसीसीआयने याअगोदर देशांतर्गत टी-२० स्पर्धा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये वापरला आहे.
भारतीय क्रिकेटरचा सुपर मार्केटमध्ये राडा; कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल!
या नवीन नियमाबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही, मात्र हा नियम सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये वापरण्यात आला आहे. ज्यामध्ये नाणेफेकीच्या वेळी ११ खेळाडूंव्यतिरिक्त तुम्हाला इतर ४ अतिरिक्त खेळाडूंची नावे द्यावी लागतील. कारण खेळाडूची बदली करायची असल्यास तुम्ही या चार खेळाडूंपैकी निवडू शकता. सामन्यादरम्यान पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या खेळाडूला ‘इम्पॅक्ट प्लेअर’ असे नाव दिले आहे. या बदली खेळाडूला डावाच्या १४ षटकांपूर्वी प्लेइंग इलेव्हनमधील कोणताही खेळाडूच्या जागी ख्रलावले जाऊ शकते.
Time for a New season 😃
Time for a New rule 😎
How big an “impact” will the substitute player have this edition of the #TATAIPL 🤔 pic.twitter.com/19mNntUcUW
— IndianPremierLeague (@IPL) December 2, 2022