भारतीय क्रिकेटरचा सुपर मार्केटमध्ये राडा; कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल!

भारतीय महिला क्रिकेटपटू राजेश्वरी गायकवाड ( Rajeshwari Gaikwad ) सध्या वादात सापडली आहे. दरम्यान, तिच्यावर सुपरमार्केटमध्ये तेथील एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राजेश्वरी गायकवाड ( Rajeshwari Gaikwad ) ही भारतीय महिला संघाची प्रमुख खेळाडू आहे. फिरकी गोलंदाजीच्या कौशल्याने तिने भारतासाठी अनेक सामन्यात दमदार कामगिरी केलेली आहे. कर्नाटकमधील विजयपूर येथील एका सुपर मार्केटमध्ये राजेश्वरीने तेथील कर्मचाऱ्यांशी भांडण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तत्पूर्वी, तेथील स्टाफसोबत बाचाबाची झाल्यानंतर राजेश्वरी गायकवाडनं मित्रांसोबत सुपर मार्केटमध्ये दंगा घातला. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये राजेश्वरी गायकवाड ( Rajeshwari Gaikwad ) काही कॉस्मेटिक उत्पादने घेण्यासाठी सुपरमार्केटमध्ये गेल्याचे दिसून येते. यावेळी तिच्यासोबत आणखी काही लोक होते, जे तिचे मित्र आणि नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान त्यांना काही वस्तूंची किंमत आवडली नाही आणि त्यांनी कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद खूप वाढला आणि त्याच्यामध्ये बाचाबाची झाली. मिळालेल्या माहितीनुसार, त्यानंतर राजेश्वरीचे मित्र तेथे आले आणि त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली.
#India women’s cricketer #RajeshwariGayakwad involved in a brawl with a supermarket employee #Cricket #WATCH pic.twitter.com/OfHrP3STri
— Free Press Journal (@fpjindia) December 1, 2022
क्रिकेट कारकीर्द
राजेश्वरी गायकवाडने १९ जानेवारी २०१४ रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६४ सामने खेळले असून ९९ गडी बाद केले आहेत. कसोटो क्रिकेटमध्ये २ सामने खेळले असून ५ बळी मिळवले आहेत. तर टी-२० क्रिकेटमध्ये ४४ सामने खेळले असून ५४ बळी घेतले आहेत. २०१७ च्या विश्वचषकात भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचला होता. तेव्हा राजेश्वरी गायकवाड देखील त्या संघाचा महत्वाचा भाग होती. तिने त्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात १५ धावांत ५ बळी घेतले होते.

