IPL Girlfriend Culture : मोठी बातमी! आयपीएलमध्ये आता गर्लफ्रेंड्सना नो एंट्री? बीसीसीआयच्या ‘या’ कठोर निर्णयाने खेळाडूंचे धाबे दणाणले
IPL Girlfriend Culture : हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, इशान किशन आणि अर्शदीप सिंग यांसारख्या खेळाडूंना अनेकदा त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत पाहिले गेले आहे.

BCCI Rules for IPL Girlfriend Culture : आयपीएल २०२६ च्या हंगामादरम्यान खेळाडूंच्या ‘गर्लफ्रेंड कल्चर’वरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)अत्यंत नाराज असल्याचे समोर आले आहे. रिपोर्टनुसार, खेळाडूंच्या या वर्तनावर आळा घालण्यासाठी बीसीसीआय आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. आगामी हंगामापासून या संस्कृतीला आळा घालण्यासाठी बोर्ड नवीन नियमांचा मसुदा तयार करणार आहे.
अंतर्गत माहिती लीक होण्याचा धोका –
सध्याच्या आयपीएल मोसमात अनेक खेळाडू आपल्या गर्लफ्रेंड सोबत घेऊन फिरत आहेत. इतकेच नव्हे तर या महिला थेट संघाच्या अधिकृत बसमधून प्रवास करत असून, संघ ज्या हॉटेलमध्ये थांबतो तिथेच त्यांच्यासोबत मुक्काम करत आहेत. यामुळे संघाच्या ड्रेसिंग रूमची आणि अंतर्गत रणनीतीची गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या दीर्घकालीन परिणामांचा विचार करून बीसीसीआयने चिंता व्यक्त केली आहे. एखादा मोठा वाद किंवा अंतर्गत बाबी बाहेर येण्यापूर्वीच यावर कडक निर्बंध लादणे बोर्डाला गरजेचे वाटत आहे.
Hardik, Arshadeep, Sameer and many more behavior has now forced BCCI to take stand against Girl friend culture.
These Nibba Nibbis has literally destroyed sports culture by being too much into each other than sport.
Above all Sameer Rizvi is cooked now.pic.twitter.com/mWFISpprLq
— Dear Men (@Dear_Men_Life) May 4, 2026
सट्टेबाजीशी जोडलेल्या इन्फ्लुएंसर्सबाबत चिंता –
काही खेळाडूंच्या कथित गर्लफ्रेंड या सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असून, त्यापैकी काही जणींनी यापूर्वी सट्टेबाजीशी (बेटिंग) संबंधित वेबसाइट्सचा प्रचारही केला आहे. या गंभीर गोष्टींमुळे बीसीसीआयच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. काही वेळा तर खेळाडूंच्या कथित गर्लफ्रेंडची वाट पाहिल्यामुळे संघाच्या बसला उशीर झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, इशान किशन आणि अर्शदीप सिंग यांसारख्या खेळाडूंना अनेकदा त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत पाहिले गेले आहे. याशिवाय, आयपीएल २०२६ मध्ये आधीच काही लहान-मोठे वाद झाले आहेत. राजस्थान रॉयल्सचे मीडिया मॅनेजर रोमी भिंडर यांनी डगआउटमध्ये मोबाईल वापरल्यामुळे, तर कर्णधार रियान परागने ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट ओढल्यामुळे त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले होते.
पुढील बैठकीत नियमांवर चर्चा –
बीसीसीआयच्या आगामी बैठकीत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होऊन नियमांचा मसुदा तयार केला जाईल. याआधी भारतीय संघाच्या परदेश दौऱ्यांबाबतही बीसीसीआयने कठोर नियम लागू केले आहेत, ज्यानुसार खेळाडूंचे कुटुंबीय विशिष्ट कालावधीपुरतेच सोबत राहू शकतात. त्यामुळे आता आयपीएलसाठीही अशाच प्रकारचे कडक नियम लागू केले जातील, अशी शक्यता आहे.





