IPL 2026 Captains : दहा संघ अन् १० शिलेदार! काही नवे तर काही अनुभवी; पाहा तुमच्या आवडत्या टीमचा कॅप्टन कोण?
IPL 2026 Captains : या हाय-व्होल्टेज हंगामासाठी सर्व १० फ्रेंचायझींनी आपल्या कर्णधारांची घोषणा केली असून, यावेळी काही जुन्या अनुभवी चेहऱ्यांसोबतच नव्या युवा खेळाडूंनाही नेतृत्वाची संधी देण्यात आली आहे.

IPL 2026 Captains List All Teams : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएल २०२६ च्या रणसंग्रामासाठी आता सर्व संघ सज्ज झाले आहेत. २८ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात होईल. या हाय-व्होल्टेज हंगामासाठी सर्व १० फ्रेंचायझींनी आपल्या कर्णधारांची घोषणा केली असून, यावेळी काही जुन्या अनुभवी चेहऱ्यांसोबतच नव्या युवा खेळाडूंनाही नेतृत्वाची संधी देण्यात आली आहे.
मुंबई आणि चेन्नईची ‘भिस्त’ पुन्हा एकदा त्याच खांद्यावर –
आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सची धुरा पुन्हा एकदा हार्दिक पंड्या सांभाळताना दिसेल. पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला सहाव्या ट्रॉफीची प्रतीक्षा आहे. तर दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाड याच्यावरच विश्वास कायम ठेवला आहे. गेल्या हंगामात धोनीच्या अनुपस्थितीत ऋतुराजने आपली नेतृत्वक्षमता सिद्ध केली होती.
आरसीबी आणि राजस्थानमध्ये मोठी उलथापालथ –
10 leaders. 10 armies. One ultimate dream – the IPL trophy. 🏆🔥
#IPL #IPLCaptains #CricketFever #CaptainCool #IPL2026 #CricketLovers #T20Cricket #RoadToTheTrophy #CricketPassion #IPLSeason pic.twitter.com/depc0RNinf
— Kriti Chauhan (@kritichauhan66) March 13, 2026
यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी बातमी म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कमान. गेल्या हंगामात आरसीबीला पहिले जेतेपद मिळवून देणाऱ्या रजत पाटीदार याच्याकडेच पुन्हा नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तर राजस्थान रॉयल्सने सर्वांना धक्का देत युवा रियान पराग याच्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. संजू सॅमसन संघात नसल्याने रियानसाठी ही मोठी संधी असेल.
अय्यर, पंत आणि गिलवर पुन्हा जबाबदारी –
गेल्या हंगामात पंजाब किंग्सला फायनलपर्यंत नेणाऱ्या श्रेयस अय्यर याच्यावर संघाने पुन्हा विश्वास दाखवला आहे. दिल्ली कॅपिटल्सची धुरा अक्षर पटेल सांभाळणार आहे, तर लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व पुन्हा एकदा ऋषभ पंत करताना दिसेल. गुजरात टायटन्सने आपल्या ‘प्रिन्स’ शुबमन गिल याच्याकडेच कर्णधारपद कायम ठेवले आहे.
IPL 2026: सर्व १० संघांचे कर्णधार –
| संघ | कर्णधार |
| मुंबई इंडियन्स | हार्दिक पंड्या |
| चेन्नई सुपर किंग्स | ऋतुराज गायकवाड |
| कोलकाता नाईट रायडर्स | अजिंक्य रहाणे |
| रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू | रजत पाटीदार |
| राजस्थान रॉयल्स | रियान पराग |
| सनरायझर्स हैदराबाद | पॅट कमिन्स |
| गुजरात टायटन्स | शुबमन गिल |
| लखनऊ सुपर जायंट्स | ऋषभ पंत |
| पंजाब किंग्स | श्रेयस अय्यर |
| दिल्ली कॅपिटल्स | अक्षर पटेल |





