IPL 2025 Sujan Mukherjee Eden Gardens Curator U turn on KKR pitch controversy : आयपीएल २०२५ सुरू होऊन आठवडाही झाला नाही की वादांची मालिका सुरू झाली आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा वाद कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीबद्दल आहे. असे म्हटले जात आहे की केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने खेळपट्टी फिरकीला अनुकूल बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु खेळपट्टीचे क्युरेटर सुजान मुखर्जी यांनी तसे करण्यास नकार दिला आहे. त्यांनी स्वतः एका मुलाखतीत याबद्दल विधान केले आहे, परंतु आता ते त्यांच्या विधानावरुन यूटर्न घेतला आहे. काय म्हणाले सुजान मुखर्जी? आता लेटेस्ट मुलाखतीत म्हटले आहे की, कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा खेळाडूने त्यांना खेळपट्टीबद्दल काहीही सांगितले नाही. सुजान मुखर्जी यांनी स्पोर्ट्स तकला सांगितले की, ‘पहिल्या सामन्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा खेळाडूने कशा प्रकारच्या खेळपट्टीची आवश्यकता आहे, याबाबत सांगितले नव्हते. सराव करताना एका प्रशिक्षकाने मला खेळपट्टीच्या वर्तनाबद्दल विचारले. मी म्हणालो, फिरकीला साथ देईल आणि चांगलीही राहील.’ कधीही कोणत्याही गोष्टीसाठी नकार दिला नाही – सुजान मुखर्जी पुढे म्हणाले, ‘मी केकेआरला कधीही कोणत्याही गोष्टीसाठी नकार दिलेला नाही. आमचे संबंध बऱ्याच काळापासून चांगले आहेत. मी बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खेळपट्टी तयार केली. जे माझ्यावर आरोप करत आहेत त्यांना काहीही माहिती नाही.’ हेही वाचा – SRH vs LSG : लखनौने तगड्या हैदराबादचा धुव्वा उडवत उघडले विजयाचे खाते, शार्दुल ठाकूर ठरला विजयाचा शिल्पकार याआधी पिच क्युरेटर काय म्हणाले होते? ईडन गार्डन्सच्या पिच क्युरेटरने यापूर्वी एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘आयपीएलच्या नियमांनुसार, फ्रँचायझीला पिचवर कोणताही अधिकार नाही. मी क्युरेटर म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून येथील पिच एक सारखीच आहेत. पूर्वीही सारख्याच होत्या. आताही परिस्थिती बदललेली नाही आणि भविष्यातही बदलणार नाही. आरसीबीच्या फिरकीपटूंनी एकत्रितपणे चार विकेट्स घेतल्या. केकेआरच्या फिरकीपटूंनी काय केले?’ हेही वाचा – SRH vs LSG : अनसोल्ड राहिल्यानंतर लखनौ संघात कसा झाला सामील? शार्दुल ठाकूरने सांगितले ‘त्या’ फोन कॉलचे गुपित त्यांच्या या विधानानंतर सर्वत्र खेळपट्टीच्या वादाची चर्चा सुरू झाली. न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू सायमन डौल यांनी केकेआरला त्यांचे होमग्राउंड बदलण्याचा सल्लाही दिला होता. त्याचबरोबर म्हणाले होते, क्युरेटरला सल्ला देण्यासाठी पैसे दिले जात नाही. त्यामुळे त्यांनी फक्त त्यांचे काम करावे.