IPL 2025 Points Table : प्रत्येक संघाने एक सामना खेळल्यानंतर IPL 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये कोणता संघ आहे टॉपवर? जाणून घ्या

IPL 2025 Points Table Updates : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १८ व्या हंगामात, सर्व १० संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला आहे. १० पैकी पाच संघ जिंकले आहेत. त्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जची नावे समाविष्ट आहेत. हंगामातील पाचव्या लीग सामन्यात, पंजाब किंग्जने यजमान गुजरात टायटन्सचा एका उच्च-स्कोअरिंग सामन्यात पराभव केला. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणता संघ कोणत्या क्रमांकावर आहे? जाणून घेऊया.
पंजाब किंग्ज पहिल्या विजयासह तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत, तर या सामन्यापूर्वी तिसऱ्या स्थानावर असलेले चेन्नई सुपर किंग्ज आता चौथ्या स्थानावर आहेत आणि चौथ्या स्थानावर असलेले दिल्ली कॅपिटल्स जीटी विरुद्ध पीबीकेएस सामन्यानंतर पाचव्या स्थानावर घसरले आहेत. त्याच वेळी, पहिल्या सामन्यानंतर, सनरायझर्स हैदराबाद अव्वल स्थानावर आहे, ज्याचा नेट रन रेट इतर संघांपेक्षा चांगला आहे.
आयपीएल २०२५च्या पॉइंट्स टेबलमधील टॉप पाच संघ –
Happy with your team's start this season? 👀#TATAIPL | #GTvPBKS pic.twitter.com/3stn7RVzvV
— IndianPremierLeague (@IPL) March 25, 2025
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या स्थानावर आहे, जे हैदराबादपेक्षा थोडे मागे आहे. एसआरएचचा नेट रन रेट +२.२०० आहे आणि त्याचे दोन गुण आहेत, तर आरसीबीचा नेट रन रेट +२.१३७ आहे आणि त्याचेही तेवढेच गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्स संघ आहे, ज्याचा नेट रन रेट +०.५५० आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्ज (+०.४९३) आणि दिल्ली कॅपिटल्स (+०.३७१) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर विराजमान आहेत. वरील सर्व संघाने त्यांचा पहिल्या सामना जिंकल्याने त्यांचे प्रत्येकी दोन गुण आहेत.
हेही वाचा – IPL 2025 : टीम बदलली अन् ‘या’ खेळाडूंचं नशीब पालटलं ! कोण आहेत ‘हे’ खेळाडू?
आयपीएल २०२५च्या पॉइंट्स टेबलमधील तळातील पाच संघ –
आता तळातील ५ संघांबद्दल बोलायचे तर लखनौ सुपर जायंट्स (-०.३७१) सहाव्या क्रमांकावर आहे, ज्याला एका विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्स (-०.४९३) सातव्या स्थानावर आहे. मुंबईलाही चुरशीच्या सामन्यात सीएसकेकडून पराभव पत्करावा लागला. गुजरात टायटन्स (-०.५५०) आठव्या स्थानावर आहे, ज्याला पंजाबने ११ धावांनी पराभूत केले. हंगामातील पहिल्याच सामन्यात आरसीबीकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स (-२.१३७) नवव्या स्थानावर आहे आणि राजस्थान रॉयल्स (-२,२००) हैदराबादकडून मोठ्या फरकाने पराभूत झाल्यानंतर शेवटच्या स्थानावर आहे. या वरील पाचही संघांनी आपला पहिला सामना गमावला आहे.





