आयपीएलचा (IPL 2025) यंदाचा हंगाम जोरदार सुरु आहे. या हंगामात आतापर्यंत झालेले चारही सामने अत्यंत रोमांचक झाले आहेत. त्यात आतापर्यंत पार पडलेल्या सामन्यात (IPL 2025) दुसऱ्या संघातून आलेल्या खेळाडूंना प्लेअर ऑफ मॅच पुरस्कार मिळाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. आतापर्यंत झालेल्या सामन्यात ज्या खेळाडूंना प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला तो खेळाडू मागच्या वर्षी दुसऱ्या संघाकडून खेळला होता. चला तर मग जाणून घेऊया या खेळाडूंबद्दल…
1) कृणाल पंड्या
यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला सामना हा कोलकत्ता नाईट रायडर्स विरूद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरू यांच्यात सामना रंगला होता.या सामन्यात आरसीबीच्या क्रुणाल पंड्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. त्याने केकेआर विरूद्ध 29 धावा देऊन 3 विकेट घेतले होते. याच कामगिरीच्या जोरावर RCB ने हा सामना जिंकला होता. क्रुणाल पंड्याला या कामगिरीनंतर प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला होता. विशेष म्हणजे कृणाल पंड्या गेल्या वर्षी लखनऊ सुपर जाएंटसमधून आयपीएल खेळला होता.
2) ईशान किशन
दुसरा सामना राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात पार पडला. या सामन्यात हैदराबादच्या ईशान किशनला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला होता.कारण त्याने 106 धावांची नाबाद शतकी खेळी केली होती. ईशान किशन मागच्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळला होता.
हे पण वाचा : MS Dhoni on Ruturaj Gaikwad : ‘…म्हणून ऋतुराजला CSK चा कर्णधार केला’, एमएस धोनीचा मोठा खुलासा; जाणून घ्या कारण
3) नूर अहमद
तिसरा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्यात नुर अहमदला प्लेअर ऑफ द मॅच देण्यात आला आहे.त्याने 18 धावा देऊन 4 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर चेन्नईने मुंबईवर मात केली. नुर अहमद हा मागच्या वर्षी गुजरातच्या संघाकडून खेळला होता.
4) आशुतोष शर्मा
चौथा सामना लखनऊ सुपर जायन्टन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. हा सामना अत्यंत रोमांचक झाला होता. या सामन्यात अखेर संघाने दिल्लीच्या संघाने लखनऊच्या संघाचा पराभव केला. या सामन्यात सुपर हिरो ठरला तो आशुतोष शर्मा. आशुतोष शर्माला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला होता. कारण आशुतोष शर्माने नाबाद ६६ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला होता. आशुतोष शर्मा मागच्या वर्षी पंजाब किंग्सच्या संघात होता.
त्यामुळे आतापर्यत जे आपला संघ सोडून दुसऱ्या संघात गेले आहेत,तेच खेळाडू प्लेअर ऑफ द मॅचचे मानकरी ठरले आहेत. आजचा सामना (IPL 2025) गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडणार आहे. आजच्या सामन्यात कोणता संघ विजयी होतो आणि कोणता खेळाडू प्लेअर ऑफ द मॅच ठरतो हे पहावे लागेल.