CSK vs MI : एमएस धोनीने वीजच्या वेगाने केली स्टंपिंग, सूर्याही झाला आश्चर्यचकित, VIDEO होतोय व्हायरल

CSK vs MI MS Dhoni quick stumping ends Suryakumar Yadav Innings : आयपीएल २०२५ चा तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. चेपॉक येथील सामन्यात महेंद्रसिंग धोनीने आपल्या जबरदस्त स्टंपिंगने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. पहिल्याच सामन्यात त्याने विजेच्या वेगाने स्टंपिंग करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याचे स्टंपिंग इतके जलद होते की मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवही चकित झाला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायर होत आहे.
सूर्याला क्रीज सोडणे पडले महागात –
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे धोनीने फक्त ०.१२ सेकंदात यष्टी विखुरल्या. हेच कारण आहे की सूर्यकुमार यादवला तो कसा बाद झाला हे समजू शकले नाही. धोनीचा वेग पाहून तोही आश्चर्यचकित झाला. यासह, ४३ वर्षीय धोनीने दाखवून दिले आहे की त्याच्या ग्लोव्हजमध्ये अजूनही तीच जुनी धार आहे. महेंद्रसिंग धोनीला उगीच जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक मानले जात नाही. त्याच्या वेगामुळे असे म्हटले जाते की, विकेट्सच्या मागे तो असताना क्रीज सोडण्याची चूक करू नये. पण सूर्यकुमार यादवने ही चूक केली, जी त्याला चांगलीच महागात पडली.
🚄: I am fast
✈: I am faster
MSD: Hold my gloves 😎Nostalgia alert as a young #MSDhoni flashes the bails off to send #SuryakumarYadav packing!
FACT: MSD affected the stumping in 0.12 secs! 😮💨
Watch LIVE action: https://t.co/uN7zJIUsn1 #IPLonJioStar 👉 #CSKvMI, LIVE NOW on… pic.twitter.com/oRzRt3XUvC
— Star Sports (@StarSportsIndia) March 23, 2025
धोनीने क्षणार्धात उडवून दिल्या यष्टी –
Lightning Quick Hands! 43yrs old??#Dhoni #MSDhoni #CSKvsMI #Ashwin #Thala #NoorAhmed #RohitSharma𓃵 #SuryakumarYadav #tilakvarma #IPL2025 pic.twitter.com/2x04ftra0v
— Roshan_7_ (@Roshan758032232) March 23, 2025
खरंतर, ११ व्या षटकात त्याला मुंबईच्या डावाला गती द्यायची होती. यासाठी, नूर अहमदविरुद्धच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर, तो क्रीजबाहेर आला आणि मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याला फटका बसला. सूर्यकुमार यादवने त्याची बॅट व्यवस्थित स्विंगही पूर्ण केली नव्हती, तेव्हा धोनीने क्षणार्धात यष्टी उडवून दिल्या. मुंबई इंडियन्स संघाचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी त्यांच्या होम ग्राउंड, चेपॉकवर खेळला जात आहे. नेहमीप्रमाणे, सीएसकेने आपले वर्चस्व दाखवले. पहिल्या डावात मुंबईच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
नूर अहमदने मोडले मुंबईचे कंबरडे –
मुंबई इंडियन्स संघाचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी त्यांच्या होम ग्राउंड, चेपॉकवर खेळला जात आहे. नेहमीप्रमाणे, सीएसकेने आपले वर्चस्व दाखवले. पहिल्या डावात मुंबईच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर, ते सीएसकेच्या फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकले आणि २० षटकांत फक्त १५५ धावाच करू शकले. विशेषतः नूर अहमदने मुंबईचे कंबरडे मोडले. त्याने ४ षटकांत फक्त १८ धावा दिल्या आणि ४ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त, त्याने तिलक वर्मा, रॉबिन मिंज आणि नमन धीर यांच्या विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय खलील अहमदने ३ विकेट्स घेतल्या. त्याच वेळी, आर अश्विन आणि नाथन एलिस यांनाही १-१ यश मिळाले





