IPL 2025 : मेगा लिलावापूर्वी RCB मध्ये मोठा बदल, मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकावर सोपविली मोठी जबाबदारी…

IPL 2025 Mega Auction : इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझीच्या नवीन हंगामाच्या मेगा लिलावापूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाने मोठा बदल केला आहे. सोमवारी फ्रेंचायझीने ओंकार साळवी यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली. साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने गेल्या मोसमात रणजी करंडक आणि इराणी करंडक स्पर्धा जिंकली होती.
देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध नाव असलेल्या साळवी यांनी यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. फ्रेंचायझीने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे की, “मुंबईचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक ओंकार साळवी यांची आरसीबीच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओंकार हे गेल्या आठ महिन्यांत रणजी ट्रॉफी, इराणी ट्रॉफी आणि आयपीएल विजेत्या संघांचा भाग होते. आता, भारतीय देशांतर्गत हंगामातील आपली जबाबदारी पूर्ण केल्यानंतर, ते आयपीएल 2025 साठी आमच्या संघासोबत जोडले जातील. यासाठी आम्ही खूप आनंदित आहोत.”
🚨 Announcement: 🚨 Omkar Salvi, current Head Coach of Mumbai, has been appointed as RCB’s Bowling Coach. 🤝☄️
Omkar, who has won the Ranji Trophy and Irani Trophy in the last 8 months, is excited to join us in time for #IPL2025, after completion of his Indian domestic season… pic.twitter.com/S0pnxrtONK
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) November 18, 2024
सध्याचा रणजी हंगाम 23 जानेवारीला पुन्हा सुरू होईल आणि तो संपल्यानंतर ओंकार हे आरसीबीमध्ये सामील होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतही ते मुंबईला मार्गदर्शन करणार आहेत. ओंकार हे माजी भारतीय क्रिकेटपटू आविष्कार साळवी याचे धाकटे भाऊ आहेत. 2005 मध्ये त्यांनी रेल्वेसाठी एकमेव लिस्ट ए सामना खेळला होता. त्याचा मार्च 2025 पर्यंत मुंबई क्रिकेट असोसिएशनशी (एमसीए) करार आहे.
दरम्यान, साल 2008 च्या पहिल्या सत्रापासून स्पर्धेत सहभागी झालेल्या आरसीबीला एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळालेले नाही. त्यामुळे यंदा आरसीबीला त्याच्याकडून फार अपेक्षा असतील.





