IPL 2025 Mega Auction : लिलावात ‘हे’ 15 दिग्गज स्टार खेळाडू राहिले अनसोल्ड, ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरसह स्मिथवरही लागली नाही बोली…

IPL 2025 Mega Auction Unsold Players List : आयपीएल 2025 चा मेगा लिलाव रविवार आणि सोमवारी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झाला. या कालावधीत सर्व 10 संघांनी एकूण 639.15 कोटी रुपये खर्च करून 182 खेळाडूंना खरेदी केले. मात्र, लिलावासाठी 577 खेळाडूंची नावे निश्चित करण्यात आली होती. यामध्ये अनेक स्टार खेळाडू होते ज्यांना लिलावात कोणीही खरेदीदार मिळाला नाही. एकाही संघाने लिलावात जागतिक क्रिकेटचे 15 स्टार खेळाडू खरेदी करण्यात रस दाखवला नाही हे पाहून संपूर्ण जगाला आश्चर्य वाटले.
ऋषभ पंत ठरला सर्वात महागडा खेळाडू…
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा सर्वात महागडा ठरला आहे. पंतला लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. याशिवाय भारताचा श्रेयस अय्यर हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. अय्यरला पंजाब किंग्जने 26.75 कोटींमध्ये घेतले. कोलकाता नाईट रायडर्सने व्यंकटेश अय्यरला 23.75 कोटी रुपयांना विकत घेतले. हे तिन्ही खेळाडू आपापल्या संघाचे कर्णधारही होऊ शकतात, असे मानले जात आहे.
लिलावात न विकल्या गेलेल्या मोठ्या खेळाडूंची यादी…
केन विल्यमसन- मूळ किंमत- 2 कोटी रुपये
स्टीव्ह स्मिथ- मूळ किंमत- 2 कोटी रुपये
जॉनी बेअरस्टो- मूळ किंमत- 2 कोटी रुपये
डॅरिल मिशेल- मूळ किंमत- 2 कोटी रुपये
पृथ्वी शॉ- मूळ किंमत- 75 लाख रुपये
सर्फराज खान- मूळ किंमत- 75 लाख रुपये
शाई होप- मूळ किंमत- 1.25 कोटी रुपये
शार्दुल ठाकूर- मूळ किंमत- 2 कोटी रुपये
Shardul Thakur goes UNSOLD! #TATAIPLAuction | #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) November 25, 2024
केशव महाराज- मूळ किंमत- 75 लाख रुपये
मुस्तफिजुर रहमान- मूळ किंमत- 2 कोटी रुपये
नवदीप सैनी- मूळ किंमत- 75 लाख रुपये
डेव्हिड वॉर्नर- मूळ किंमत- 2 कोटी रुपये
मयंक अग्रवाल- मूळ किंमत- 1 कोटी रुपये
ज्यूनिअर एबी- मूळ किंमत- 75 लाख रुपये
शिवम मावी- मूळ किंमत- 75 लाख रुपये
IPL 2025 Mega Auction : अखेर रहाणेसह ‘त्या’ दोन खेळाडूंना KKRनं केलं खेरदी…
वैभव सूर्यवंशी ठरला सर्वात तरुण खेळाडू…
बिहारचा 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी याचं नाव लिलावात समोर आलं तेव्हा संपूर्ण जगाला धक्का बसला. या अवघ्या 13 वर्षांच्या खेळाडूमध्ये अनेक संघांनी रस दाखवला. अखेर राजस्थान रॉयल्सने वैभवला 1.10 कोटी रुपयांना खरेदी केले. आयपीएलच्या इतिहासात लिलावात विकला जाणारा वैभव हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. याशिवाय तो आयपीएलचा सर्वात तरुण करोडपती खेळाडू बनला आहे.





