IPL Mega Auction 2025 : लिलावात UNSOLD राहिलेल्या खेळाडूनं रचला इतिहास, अवघ्या 28 चेंडूत झळकावले शतक…

Urvil Patel Century : गुजरातच्या उर्विल पटेलने बुधवारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये इतिहास रचला, जिथे त्याने केवळ 28 चेंडूत शतक झळकावले. आपल्या डावात त्याने केवळ 35 चेंडूंचा सामना केला आणि 322 च्या तुफानी स्ट्राइक रेटने 113 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर त्याने टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजाचा सर्वात वेगवान शतकाचा विक्रमही मोडीत काढला आहे. त्याच्या खेळीत सात चौकार आणि 12 षटकारांचा समावेश होता.
🚨 URVIL PATEL CREATED HISTORY 🚨
Urvil Patel smashed Hundred from just 28 balls in Syed Mushtaq Ali, fast hundred by an Indian in T20 history, breaking the record of Rishabh Pant 🙇
– Urvil Patel, WK batter was unsold in the auction. pic.twitter.com/K0Ju13pKFY
— Johns. (@CricCrazyJohns) November 27, 2024
यासह उर्विल पटेलने टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाज म्हणून सर्वात जलद शतक झळकावण्याच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाने त्रिपुराविरुद्ध एमराल्ड हाइट्स इंटरनॅशनल स्कूल ग्राउंड, इंदूर येथे ही खेळी खेळली. त्याच्या आधी ऋषभ पंतने 2018 मध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हिमाचल प्रदेश विरुद्ध दिल्लीसाठी 32 चेंडूत शतक झळकावून हा विक्रम आपल्या नावावर केला होता. पटेलचे शतक हे टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. त्याच्याआधी इस्टोनियाच्या साहिल चौहानने या वर्षाच्या सुरुवातीला सायप्रसविरुद्ध 27 चेंडूंत शतक झळकावले होते.
कोण आहे उर्विल पटेल?
मेहसाणा, बडोदा येथील रहिवासी असलेल्या उर्विलने 2018 मध्ये राजकोटमध्ये मुंबई विरुद्धच्या T-20 सामन्यातून बडोद्यासाठी पदार्पण केले. त्याच वर्षी त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्येही प्रवेश केला. पण रणजी ट्रॉफीच्या शेवटच्या आवृत्तीत पदार्पण करण्यापूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यासाठी त्याला सहा वर्षे वाट पहावी लागली. गुजरात टायटन्सने 2023 च्या हंगामासाठी उर्विलला 20 लाख रुपयांना विकत घेतले होते, परंतु त्यावेळी त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
मेगा लिलावात उर्विल अनसोल्ड…
गुजरातने रिलीज केल्यानंतर, यावेळी झालेल्या मेगा लिलावात कोणत्याही संघाने त्याच्यासाठी स्वारस्य दाखवले नाही, त्यामुळे तो अनसोल्ड राहिला. आतापर्यंत त्याने 44 टी-20 सामन्यांमध्ये 23.52 च्या सरासरीने आणि 164.11 च्या स्ट्राईक रेटने 988 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे.





