IPL 2025 Mega Auction : पहिल्या अन् दुसऱ्या फेरीत UNSOLD राहिलेल्या अर्जुन तेंडुलकरची ‘या’ संघानं वाचवली लाज….

IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 मेगा लिलावात दोनदा(पहिली-दुसरी फेरी) न विकल्या गेलेल्या अर्जुन तेंडुलकरला अखेर खरेदीदार संघ सापडला आहे. मुंबई इंडियन्सने शेवटच्या फेरीत अर्जुनला त्याच्या मूळ किमतीत विकत घेतले. अर्जुन याआधीही मुंबईचा भाग होता, पण टीमने त्याला लिलावापूर्वी रिलिज केले होते. पहिल्या फेरीनंतर अर्जुनचे नाव दुसऱ्या फेरीतही आले, पण भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर याच्या मुलाला विकत घेण्यासाठी कोणत्याही संघामध्ये रस दिसत नव्हता.
सलग दोन फेऱ्यांमध्ये अनसोल्ड राहिल्यानंतर मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरवर (Arjun Tendulkar)पुन्हा एकदा दाव खेळला आहे. मुंबईने अर्जुनला त्याची मूळ किंमत 30 लाख रुपये देऊन विकत घेतले आहे. अर्जुन पहिल्या आणि नंतर दुसऱ्या फेरीत अनसोल्ड राहिला. त्याच्या नावावर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. मात्र, अखेरच्या फेरीत मुंबईने अर्जुनचा आपल्या संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला.
🚨 आला रे 🚨
Arjun Tendulkar | 🇮🇳
💰: 30 L#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPLAuction— Mumbai Indians (@mipaltan) November 25, 2024
अर्जुन गेल्या दोन हंगामात मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. मात्र, गेल्या मोसमात अर्जुनला केवळ एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात अर्जुनला एकही विकेट घेता आली नाही. त्याच वेळी, 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या 4 सामन्यांमध्ये अर्जुनला केवळ तीन विकेट घेता आल्या. अर्जुनने 2023 साली पंजाब किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात एकाच षटकात 31 धावा दिल्या होत्या.
IPL 2025 Mega Auction : अखेर रहाणेसह ‘त्या’ दोन खेळाडूंना KKRनं केलं खेरदी…
रणजी ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी…
रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याकडून खेळताना अर्जुन तेंडुलकरची कामगिरी अप्रतिम होती. अरुणाचल प्रदेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात अर्जुनने नव्या चेंडूने धुमाकूळ घातला आणि पाच विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे अर्जुनला मेगा लिलावात मोठी रक्कम मिळू शकेल, असे मानले जात होते. मात्र, मुंबई वगळता एकाही संघाने या युवा खेळाडूच्या नावावर बोली लावली नाही. अर्जुन या मोसमात आपली छाप सोडण्यास नक्कीच उत्सुक असेल.





