IPL 2025 Match Tickets : आयपीएल सामन्यांची तिकिटं कशी खरेदी करता येणार? CSK च्या चाहत्यांना मिळणार दुहेरी फायदा

How buy IPL 2025 Match Tickets : येत्या काही दिवसांत आयपीएल २०२५ चा हंगाम सुरू होणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, एका गोष्टीची सर्वाधिक चर्चा होते आणि ती म्हणजे आयपीएल सामन्यांची तिकिटे. चाहते तिकिटे मिळविण्यासाठी कितीही पैसे खर्च करण्यास तयार असतात. तिकिटे मिळविण्यासाठी लांब रांगेत उभे राहण्यातही अजिबात संकोच वाटत नाही, ते अगदी ब्लॅकने पण तिकिटे खरेदी करतात. मात्र, तुम्हाला अशा समस्येचा सामना करावा लागू नये म्हणून, तुम्ही तिकिटे कशी मिळवू शकता हे आपण जाणून घेऊया.
खरंतर, आयपीएलमध्ये दरवेळीप्रमाणे, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याच्या तिकिटांची मागणी खूप जास्त आहे. याशिवाय, स्पर्धेच्या पहिल्या सामन्याच्या तिकिटांसाठीही गर्दी आहे. तसेच एमएस धोनीचे चाहते सामन्यांची तिकिटे कशी मिळवायची आणि सीएसके सामन्यांची तिकिटे कुठून खरेदी करायची हे देखील जाणून घ्या, कारण प्रत्येकजण याबद्दल उत्सुक आहे.
आयपीएल सामन्यांची तिकिटे खरेदी कशी करता येणार?
जर तुम्हाला कोणत्याही आयपीएल सामन्याची किंवा सीएसके विरुद्ध एमआय सामन्याची तिकिटे खरेदी करायची असतील, तर तुम्हाला आयपीएल वेबसाइटवर जावे लागेल आणि तेथून तुम्ही सामन्याची तिकिटे खरेदी करू शकता. परंतु, आयपीएलची अधिकृत वेबसाइट तुम्हाला बुक माय शो वर घेऊन जाईल, जिथून तुम्ही आयपीएल सामन्यांची तिकिटे खरेदी करू शकाल.
हेही वाचा – BCCI Family Rule : ‘कुटुंबाची गरज आहे पण…’, विराटच्या कुटुंबाबद्दलच्या वक्तव्यावर कपिल देव यांची प्रतिक्रिया
याशिवाय, तुम्ही फ्रँचायझीच्या वेबसाइटवर सामन्यांची तिकिटे देखील खरेदी करू शकता. मात्र, काही मोजक्याच फ्रँचायझी त्यांच्या चाहत्यांना ही सुविधा देतात. याशिवाय, जर तुम्हाला ऑनलाइन तिकिटे खरेदी करायची नसतील, तर तुम्ही स्टेडियममधील तिकीट काउंटरवरून आयपीएल सामन्यांची तिकिटे देखील खरेदी करू शकता.
सीएसके चाहत्यांसाठी दुहेरी फायदा –
जर तुम्ही चेन्नई सुपर किंग्ज म्हणजेच सीएसके संघाचे चाहते असाल आणि तुम्हाला चेन्नईमध्ये सीएसकेचे होम सामने पहायचे असतील, तर तुम्हाला तिकीट खरेदी केल्यावर अतिरिक्त फायदा मिळेल. तुम्ही चेन्नई मेट्रो आणि सरकारी शहर बसने प्रवास करू शकता (एसी बस वगळता). यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. तिकिटावरील QR कोड वापरून तुम्ही मेट्रो आणि बसमध्ये प्रवास करू शकाल. इतर कोणत्याही फ्रँचायझीने ही सुविधा दिलेली नाही. सीएसकेने मेट्रो आणि वाहतूक विभागासोबत करार केला आहे.





