IPL 2025 Final : पंजाबने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

IPL 2025 Final RCB vs PBKS Match Updates : आज आयपीएल २०२५ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. अशात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी आहे? जाणून घेऊया.
बंगळुरूविरुद्धच्या अंतिम सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार श्रेयसने सांगितले की त्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याच वेळी, आरसीबीने देखील इलेव्हनमध्ये मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
For the title. For the team. For the legacy ❤
The 2️⃣ Captains are ready for the last battle of the season 🏆
Updates ▶ https://t.co/U5zvVhcvdo#TATAIPL | #RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @RCBTweets | @PunjabKingsIPL pic.twitter.com/zgTfMVCu29
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
१७ फायनलमध्ये ‘हे’ घडलयं –
यापूर्वी आयपीएलच्या अंतिम सामन्यात, पाठलाग करणाऱ्या संघाने १७ पैकी आठ वेळा ट्रॉफी जिंकली आहे. त्याच वेळी, अहमदाबादमध्ये या हंगामात आतापर्यंत आठ सामने खेळले गेले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सहा सामने जिंकले आहेत, तर पाठलाग करणाऱ्या संघाने दोन सामने जिंकले आहेत. पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या २१९ धावा आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
The Starting XIs of @RCBTweets and @PunjabKingsIPL for the #Final are locked in 🔒💪
Pick your match-winner 👇
Updates ▶ https://t.co/U5zvVhcvdo#TATAIPL | #RCBvPBKS | #TheLastMile pic.twitter.com/6rU2R6Gqsn
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमारियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवुड
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार विषक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल





