CSK vs MI : चेन्नईने पहिल्याच सामन्यात मुंबईला पाजलं पाणी, ऋतुराज-रचिनच्या अर्धशतकाच्या जोरावर मारली बाजी

IPL 2025 CSK vs MI Chennai Super Kings beat Mumbai Indians by 4 wickets : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२५ ची सुरुवात विजयाने केली आहे. २३ मार्च रोजी, चेपॉक येथे झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईविरुद्ध ४ विकेट्सनी विजय मिळवला. यासह चेन्नई संघाने हंगामातील पहिल्याच सामन्यात आपले वर्चस्व दाखवले. प्रथम गोलंदाजीने आणि नंतर शानदार फलंदाजीने मुंबई संघावर वर्चस्व निर्माण करत सामन्यात बाजी मारली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना मुंबई संघाला १५५ धावा रोखले. त्यानंतर प्रत्युत्तरात रचिन-ऋतुराज यांच्या अर्धशतकाच्या जोरावर १९.१ षटकांत ६ गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला.
हंगामातील पहिल्या सामन्यातील मुंबईचा सलग १३ वा पराभव –
नियमित कर्णधार हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत पहिला सामना खेळणाऱ्या मुंबईला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. २०१२ नंतर मुंबईने हंगामातील पहिला सामना जिंकलेला नाही. पहिल्या सामन्यातील हा त्यांचा सलग १३ वा पराभव आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून १५५ धावा केल्या, त्यानंतर सीएसकेकडून रचिन रवींद्रने ६५ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यामुळे, मुंबई इंडियन्सला सलग १३ व्या हंगामात आयपीएलमधील त्यांचा पहिला सामना जिंकण्यात अपयश आले.
𝙁𝙞𝙣𝙞𝙨𝙝𝙞𝙣𝙜 𝙬𝙞𝙩𝙝 𝙖 𝘽𝘼𝙉𝙂 💪
Rachin Ravindra takes #CSK to a win over #MI with a brilliant maximum 💛
Scorecard ▶ https://t.co/QlMj4G7kV0#TATAIPL | #CSKvMI | @ChennaiIPL pic.twitter.com/rVjsGQOHyD
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
लक्ष्याचा पाठलाग करताना रचिन रवींद्रने बजावली महत्त्वाची भूमिका-
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला १५६ धावांचे लक्ष्य मिळाले होते, ज्याचा पाठलाग करताना त्यांनी राहुल त्रिपाठीच्या रूपात ११ धावांवर पहिली विकेट गमावली. यानंतर, फलंदाजीसाठी आलेल्या सीएसके संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने रचिन रवींद्रसह दुसऱ्या विकेटसाठी ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आणि या सामन्यात संघाला मजबूत स्थितीत आणले. २६ चेंडूत ५३ धावांची खेळी खेळून गायकवाड पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, त्यांनी अचानक त्यांचे पुढील तीन विकेट्स खूप लवकर गमावले, ज्यामध्ये शिवम दुबे, दीपक हुडा आणि सॅम करन यांच्या विकेट्सचा समावेश होता.
हेही वाचा – CSK vs MI : एमएस धोनीने वीजच्या वेगाने केली स्टंपिंग, सूर्याही झाला आश्चर्यचकित, VIDEO होतोय व्हायरल
रचिन रवींद्रने ठोकला विजयी षटकार –
रचिनने एका टोकापासून डावाला एकजुटीने सांभाळले आणि रवींद्र जडेजासोबत सहाव्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी केली. या सामन्यात १८ चेंडूत १७ धावा करून जडेजा बाद झाला तेव्हा सीएसकेला जिंकण्यासाठी ४ धावांची आवश्यकता होती. यानंतर, रचिनला धोनीची साथ मिळाली आणि दोघेही ५ चेंडू आधीच संघाला विजय मिळवून देऊन परतले. रचिनच्या बॅटमधून ४५ चेंडूत ६५ धावांची खेळी दिसून आली. विशेष म्हणजे विजयी षटकारही रचिन रवींद्रनेच मारला. मुंबईकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पदार्पण करणाऱ्या विघ्नेश पुथूरने तीन विकेट्स घेतल्या तर दीपक चहर आणि विल जॅक्स यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.





