IPL 2025 KKR vs RCB : केकेआर की आरसीबी पहिल्या सामन्यात कोणाच पारडं जड? जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड

IPL 2025 1st Match KKR vs RCB head to head record : आयपीएल २०२५ ची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) यांच्यातील धमाकेदार सामन्याने होणार आहे. हा सामना कोलकाताच्या येथील ईडन गार्डन्सवर २२ मार्च रोजी खेळला जाणार आहे. हा सामना खूपच रोमांचक होण्याची शक्यता आहे.कारण एकीकडे आरसीबीकडे विराट कोहली आहे आणि दुसरीकडे केकेआरकडे आंद्रे रसेलसारखे तगडे खेळाडू आहेत.
ईडन गार्डन्स केकेआरचा बालेकिल्ला –
ईडन गार्डन्सचा इतिहास खूप जुना आहे. येथील वातावरण नेहमीच उत्तम असते. म्हणूनच कोलकाता नाईट रायडर्ससाठी हा एक मजबूत किल्ला मानला जातो. हे स्टेडियम खूप मोठे आहे आणि येथील प्रेक्षकांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. केकेआरचा येथे चांगला रेकॉर्ड आहे. त्यांनी येथे ९० पैकी ५२ सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, आरसीबीने ईडन गार्डन्सवर १३ पैकी फक्त ५ सामने जिंकले आहेत. ईडन गार्डन्सची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांना अनुकूल असते. पण फिरकी गोलंदाजांनाही येथे मदत मिळते. यामुळे बॅट आणि बॉलमध्ये एक निकोप स्पर्धा होते.
CAN. NOT. WAIT! 🤩
ONLY 1️⃣ Sleep Away 🥳#TATAIPL 2025 is nearly here ⏳ pic.twitter.com/lU533Z64Nu
— IndianPremierLeague (@IPL) March 21, 2025
केकेआर विरुद्ध आरसीबी सामना कोण जिंकेल?
आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात केकेआर आणि आरसीबी संघात एकूण ३४ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी २० सामन्यात केकेआरने आणि १६ सामन्यात आरसीबी बाजी मारली आहे. यासह या मैदानावरील रेकॉर्ड आणि मागील विजयाच्या अंदाजांनुसार, केकेआरच्या जिंकण्याची शक्यता ५३.७९% आहे. तर आरसीबीच्या जिंकण्याची शक्यता ४६.२१% आहे. पण टी-२० क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. त्या दिवशी संघ कसे खेळतात यावर सर्व अवलंबून आहे. दोन्ही संघांमध्ये अनुभवी आणि तरुण खेळाडू आहेत. त्यामुळे हा सामना खूपच रोमांचक होणार आहे.
हेही वाचा – IPL 2025 KKR vs RCB : आयपीएलचा पहिलाच सामना रद्द होणार? जाणून घ्या काय आहे कारण?
दोन्ही संघांची धुरा नवीन कर्णधारांच्या हाती –
आयपीएल २०२५ मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ नवीन कर्णधारांसह मैदानात उतरत आहेत. या हंगामात, रजत पाटीदार आरसीबीचे नेतृत्व करताना दिसतील, तर केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करेल. आतापर्यंत, ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एकूण १२ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी केकेआरने ८ सामने जिंकले आहेत, तर बेंगळुरूने फक्त ४ सामने जिंकले आहेत.





