IPL 2024 (PBKS vs SRH Match 23) : वीस वर्षीय नितीश रेड्डीचा आयपीएलमध्ये करिष्मा; रोहित-रैनाचा मोठा विक्रम काढला मोडीत…

IPL 2024 (PBKS vs SRH Match 23) : आयपीएल 2024 चा 23 वा सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. हैदराबादने हा सामना 2 धावांनी जिंकला. या सामन्यात 20 वर्षीय नितीश रेड्डीने अप्रतिम अष्टपैलू कामगिरी करून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यासाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. 37 चेंडूत 64 धावांची खेळी आणि 1 बळी घेऊन नितीशने रोहित शर्मा आणि सुरेश रैनाचा आयपीएलचा मोठा विक्रमही मोडीत काढला.
रोहित-रैनाचा मोडला विक्रम…
नितीश याचे वय 20 वर्षे आहे. एका सामन्यात 50+ धावा आणि किमान एक विकेट घेणारा तो आयपीएल इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. नितीश याने वयाच्या 20 वर्ष 319 दिवसात ही कामगिरी केली. याआधी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. रोहित शर्माने वयाच्या 21 वर्षे 23 दिवसांमध्ये तर सुरेश रैनाने वयाच्या 22 वर्षे 145 दिवसांत ही कामगिरी केली होती. त्याचबरोबर यंदाच्या मोसमात सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा अभिषेक शर्माही या यादीत आहे. वयाच्या 22 वर्ष 237 दिवसात त्याने अशी कामगिरी केली. अँजेलो मॅथ्यूजने वयाच्या 22 वर्षे 238 दिवसात ही कामगिरी केली होती.
Superb knock, Amazing catch, Crucial bowling! 👌 👌
Nitish Kumar Reddy made his presence felt today and wins the Player of the Match Award 👏 👏
Scorecard ▶ https://t.co/JP3mpkETgx #TATAIPL | #PBKSvSRH | @SunRisers pic.twitter.com/QBpsw9vM69
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2024
IPL सामन्यात 50+ धावा करणारा आणि किमान 1 बळी घेणारा सर्वात तरुण खेळाडू…
20 वर्षे 319 दिवस – नितीश कुमार रेड्डी
21 वर्षे 23 दिवस – रोहित शर्मा
22 वर्षे 154 दिवस – सुरेश रैना
22 वर्षे 237 दिवस – अभिषेक शर्मा
22 वर्षे 283 दिवस – अँजेलो मॅथ्यूज
नितीशने केली शानदार फलंदाजी…
नितीश रेड्डी याने पंजाब किंग्जविरुद्ध शानदार फलंदाजी करत 37 चेंडूत 67 धावा केल्या. नितीशच्या बॅटमधून जबरदस्त पॉवर हिटिंग पाहायला मिळाली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 5 षटकार मारले. एकेकाळी डळमळीत झालेल्या हैदराबादच्या डावाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्यात नितीशने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर गोलंदाजी करतानाही त्याने विकेट घेतली. 3 षटके टाकताना नितीशने 33 धावा देत जितेश शर्माची विकेट घेतली.





