IPL 2024 (GT vs CSK Match 59) : गुजरातचा दणदणीत विजय, चेन्नईच्या पराभवामुळे प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक…

IPL 2024 (GT vs CSK Match 59, Match Result) : आयपीएल 2024 च्या 59 व्या सामन्यात आज (10 मे) गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने-सामने होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. गुजरातसाठी हा नॉकआऊट सामना होता तर चेन्नईसाठीही प्लेआॅफच्या दृष्टीनं विजय महत्त्वाचा होता. अशा सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 35 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह गुजरातने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
त्याचवेळी चेन्नईच्या पराभवामुळे प्लेऑफची शर्यत रोमांचक बनली आहे. गुजरातच्या या विजयाने आरसीबीला प्लेऑफमध्येही जिवंत ठेवले आहे.चेेेेेेेन्नईला पात्र होण्यासाठी पुढील दोन सामने जिंकावे लागतील. चेन्नई सुपर किंग्जचा पराभव ही आरसीबीसाठीही चांगली बातमी आहे कारण चेन्नईच्या विजयामुळे त्यांचा टॉप-4 मध्ये जाण्याचा मार्ग कठीण होऊ शकत होता.पराभवानंतरही चेन्नईचा संघ 12 सामन्यांत सहा विजय आणि सहा पराभवांसह 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. गुजरातचा संघ 12 सामन्यांतून पाच विजय आणि सात पराभवांसह 10 गुणांसह आठव्या स्थानावर आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 3 गडी गमावून 231 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती.प्रत्युत्तरात गुजरातच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केल्यामुळे चेन्नईचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 196 धावाच करू शकला. चेन्नईकडून डॅरिल मिशेलने 63 आणि मोईन अलीने 56 धावा केल्या. चौथ्या विकेटसाठी या दोन फलंदाजांमध्ये 109 धावांची भागीदारी झाली, पण मिचेल बाद झाल्यानंतर चेन्नईचा डाव पुन्हा एकदा डळमळीत झाला आणि त्याला सावरता आले नाही.आठव्या क्रमांकावर उतरलेला महेंद्रसिंग धोनी 11 चेंडूंत 1 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 26 धावा करून नाबाद माघारी परतला.
गुजरातकडून मोहित शर्मा आणि राशिद खान यांनी शानदार कामगिरी केली. मोहितने 3 तर रशीदने 2 बळी घेतले.मोहित शर्माने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने डॅरिल मिशेल, मोईन अली आणि शिवम दुबे यांच्या महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, चेन्नईचा कर्णधार रुतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 3 गडी गमावून 231 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती.
Highest Opening Partnership for #GT ✅
Equalled Highest Opening Partnership in IPL ✅Courtesy of the centurions, the hosts set a massive 🎯 of 2️⃣3️⃣2️⃣ 👏
A huge #CSK chase coming up next ⏳
Scorecard ▶️ https://t.co/PBZfdYswwj#TATAIPL | #GTvCSK pic.twitter.com/eeLGLcOzyQ
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2024
गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलने 55 चेंडूत नऊ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या तर साई सुदर्शनने 51 चेंडूत पाच चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 103 धावा केल्या. सुदर्शनचे हे पहिले आयपीएल शतक होते. त्याचवेळी शुभमनने आयपीएल कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. डेव्हिड मिलरने 11 चेंडूत 16 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तर शाहरुख खान दोन धावा करून धावबाद झाला.
शुभमन आणि सुदर्शन यांच्यात 210 धावांची विक्रमी भागीदारी झाली. चेन्नईने पहिल्या सहा षटकात 58 धावा खर्च केल्या होत्या. त्याच वेळी, 7 ते 15 षटकांमध्ये म्हणजेच नऊ षटकांत गुजरातने एकही विकेट न गमावता 132 धावा केल्या. 15 षटकांनंतर गुजरातची धावसंख्या एकही विकेट न गमावता 190 धावा होती. शेवटच्या पाच षटकांत गुजरात संघाला केवळ 41 धावा करता आल्या आणि तीन विकेट गमावल्या.
चेन्नईकडून तुषार देशपांडेने दोन गडी बाद केले. त्याने 4 षटकात 33 धावा दिल्या.सिमरजीत सिंह (4 षटकात 60 धावा) ,मिचेल सेंटनर (2 षटकात 31), शार्दुल ठाकुर( 4 षटकात 25 धावा),डेरिल मिचेल ( 4 षटकात 52) आणि रवींद्र जडेजा (2 षटकात 29 धावा) यांना एकही विकेट मिळाली नाही.





