IPL 2024 (GT vs DC Match 40) : गुजरात आज दिल्लीशी भिडणार..! मागील पराभवाचा बदला घेण्यासाठी गिलसेना सज्ज, जाणून घ्या Pitch Report सह सर्व डिटेल्स..

IPL 2024, Delhi Capitals vs Gujarat Titans : आयपीएल 2024 चा 40 वा सामना आज(बुधवार, 24 एप्रिल) अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांचा हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. चालू हंगामात दिल्ली आणि गुजरात याआधीही आमनेसामने आले होते, ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने 6 गडी राखून विजय मिळवला होता. तेव्हा दिल्लीला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करून मागील पराभवाचा बदला घेण्याचे आणि गुणतालिकेत आपले स्थान सुधारण्याचे गुजरात टायटन्सचे लक्ष्य असेल.
आयपीएल (IPL 2024) मध्ये गुजरात टायटन्सने आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. हा संघ सध्या 8 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, दिल्ली संघ 8 व्या क्रमांकावर आहे, ज्याने आतापर्यंत 8 सामन्यांत केवळ 3 विजय मिळवले आहेत. दिल्लीने त्यांच्या घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळला तेव्हा त्यांना हैदराबाद (SRH) कडून 67 धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे, गुजरात टायटन्स विजयी घोडदौड घेऊन मैदानात उतरणार आहे. त्याआधी दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन कसे असू शकतात आणि खेळपट्टीची स्थिती कशी असेल हे जाणून घेऊया.
DC vs GT : खेळपट्टीची स्थिती कशी असेल?
या खेळपट्टीवर जेव्हा SRH आणि DC यांच्यात सामना झाला तेव्हा सामन्यात एकूण 465 धावा झाल्या होत्या. यावेळीही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असेल, त्यामुळे उच्च धावसंख्येचा सामना अपेक्षित आहे. IPL 2024 मध्ये अरुण जेटली स्टेडियमवर फक्त 1 सामना खेळला गेला असला तरी, जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर, पाठलाग करणारा संघ अधिक प्रसंगी विजयी झाला आहे. या खेळपट्टीवर गोलंदाजीत फिरकीला नाही, पण वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते.
DC vs GT : मॅच प्रिडिक्शन…
आयपीएल 2024 मध्ये जॅक फ्रेझर मॅकगर्कच्या रूपात सलामीवीर मिळाल्याने दिल्ली कॅपिटल्सची स्थिती सुधारली आहे. फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीचे संयोजन अधिक चांगले दिसते. पण गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची लय विरोधी फलंदाजांना अडचणीत टाकू शकते. गेल्या वेळी (बुधवार,17 एप्रिल) झालेल्या 32 व्या सामन्यात दिल्लीने गुजरातला त्यांच्याच घरच्या मैदानावर अवघ्या 89 धावांत गुंडाळले होते आणि सामना 6 विकेट्सने जिंकला होता. सर्व परिस्थितीवर नजर टाकल्यास दिल्लीचा संघ वर्चस्व गाजवत असल्याचे दिसते.
DC vs GT : हेड टु हेट रिकाॅर्डस…
दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स आयपीएलमध्ये आतापर्यंत केवळ 4 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये दिल्लीने दोनदा आणि गुजरातने दोनदा बाजी मारली आहे, मात्र गेल्या लढतीत डीसीने बाजी मारली होती. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सची मानसिक स्थिती भक्कम असेल.
IPL : सुरेश रैनाने IPL चॅम्पियन न झालेल्या संघांचा केला पर्दाफाश, म्हणाला “जे संघ पार्टी करण्यावर….”
DC vs GT : हवामान अंदाज….
हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल, कारण प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी विजय आवश्यक आहे. पण, सोमवारी संध्याकाळी दिल्लीत झालेल्या अवकाळी पावसाने चाहत्यांची चिंता वाढवली आहे. कारण त्यांना वाटतं की, बुधवारीही सामन्यादरम्यान हवामान बिघडेल की काय…? वास्तविक, आयपीएल 2024 चा दिल्ली विरूध्द गुजरात हा दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. अशा परिस्थितीत आपापल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी चाहत्यांची गर्दी स्टेडियमवर पोहोचेल. आता 24 एप्रिलच्या दिल्लीच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर पावसाची शक्यता फारच कमी आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दिल्ली आणि गुजरातच्या सामन्याच्या दिवशी पावसाची फक्त 1% शक्यता आहे. तापमान 38 ते 24 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आर्द्रता 35% पर्यंत असेल, वाऱ्याचा वेग ताशी 14 किलोमीटर असेल.
Team India : ‘या’ 9 खेळाडूंचे T20 विश्वचषक संघातील स्थान निश्चित, IPLमध्ये करत आहेत चमकदार कामगिरी…
DC vs GT : संभावित प्लेइंग इलेवन…
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर मॅकगर्क, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, ललित यादव, अक्षर पटेल, इशांत शर्मा, मुकेश कुमार, कुलदीप यादव.
गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, राशिद खान, साई किशोर, नूर अहमद, मोहित कुमार.





