IPL 2024 (#CSKvRCB Match 1) | माही भाईकडून फिनिशिंग शिकलो – शिवम दुबे

IPL 2024 , CSK vs RCB Match 1 :– मला कठीण सामने पूर्ण करायला आवडतात. दडपणखाली माझा खेळ आणखी बहरतो. माही भाई (एम. एस. धोनी) हे जगातील सर्वोत्तम फिनिशर पैकी एक आहेत. त्यामुळे एका चांगल्या फिनिशरची ही कला मी त्यांच्याकडूनच आत्मसात केलेली आहे, असे मत भारताचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे याने व्यक्त केले.
दुबेने शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 34 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली आणि पाचव्या विकेटसाठी रवींद्र जडेजा (नाबाद 25) सोबत 66 धावांची अखंड भागीदारी करून चेन्नईला सहा गडी राखून विजय मिळवून दिला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-2024-csk-vs-rcb-live-cricket-score-chennais-resounding-victory-in-the-first-match-defeated-rcb-by-six-wickets/
दुबेने त्याबद्दल सांगितले की, या सामन्यातील अनुभव विलक्षण होता. चेन्नईसाठी फिनिशिंग मॅचेस हे मला नेहमीच आवडते. प्रत्येक सामन्यात मी ती करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही असा सामना संपवता तेव्हा खूप छान वाटते, विशेषत: हंगामातील पहिल्या सामन्यात ते करता येण्याचा आनंद काही औरच असतो.





