IPL 2023 : ‘CSK vs DC’ अशी रंगणार लढत; कोणाचे पारडे ठरेल जड ?

चेन्नई – आयपीएल 2023 चा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. त्यामुळे सर्वच संघांसाठी प्रत्येक सामना महत्वाचा असणार आहे. आजचा सामना चेन्नई विरुद्ध दिल्ली असा रंगणार आहे. तसेच हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ मागील सामन्यात विजय मिळवल्यानंतर आज मैदानात उतरणार आहे.
दोन्ही संघ विजयी मार्गावर कायम राहण्याचा प्रयत्न करणार असून प्लेऑफमध्ये स्थान कायम राखण्यासाठी चेन्नई संघांसाठी आजचा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. तर दिल्ली संघांची मागील काही सामन्यांतील कामगिरी पाहता दिल्ली कॅपिटल्स आजचा सामना जिंकून बाजी पलटण्याचा प्रयत्न कारणार आहे.
चेन्नईने 11 पैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर चार सामने गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. तर दिल्ली कॅपिट्ल्स सध्या दहाव्या स्थानावर आहे. दिल्ली संघाने त्यांच्या 10 पैकी चार सामन्यांत विजय मिळवला तर सहा सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकतंय हे बघणं महत्वाचं ठरेल.
चेन्नई सुपर किंग्स-
ऋतुराज गायकवाड़, डेवोन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, एम. एस. धोनी (कर्णधार), मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चाहर, महेश तीक्षणा, तुषार देशपांडे आणि एम पथिराना
दिल्ली कॅपिटल्स-
डेविड वॉर्नर (कर्णधार ), फिल सॉल्ट, मिचेल मार्श, रिले रोसोव, अक्षर पटेल, मनीष पांडे, अमन हकीम खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार, ईशांत शर्मा आणि खलील अहमद





