iPhone 17 : युनिक डिझाईन आणि नवीन चीपसह लाँच होणार ‘iPhone 17’; ‘Google Pixel’ला करणार कॉपी?

Apple iPhone 17 : जगातील सर्वात लोकप्रिय फोन ॲपल आयफोन 16 सीरीज लाँच होऊन जास्त वेळ गेलेला नाही, पण आता नवीन ‘आयफोन 17’ सीरीजमध्ये काय खास असणार आहे याची चर्चा सुरू झाली आहे.
आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, iPhone 17 सीरीजचा फोन एकदम वेगळा असू शकतो, जे फोटो लीक होत आहेत ते पाहता ॲपल ‘Google Pixel’ला कॉपी करणार असल्याचं दिसून येत आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, ॲपल आपल्या नवीन 17 सीरीज फोन्समध्ये सर्वात पातळ आयफोनचा एक प्रकार आणण्याची योजना करत आहे. हा आत्तापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन असू शकतो म्हणजेच 5 ते 6 मिमी जाडीचा असेल.
या फोनला ‘Apple iPhone 17 Air’ असे नाव देऊ शकते. हा फोन 6mm च्या जाडीच्या रेंजमध्ये ठेवण्यासाठी कंपनी त्याच्या डिझाइन आणि वैशिष्ट्यांमध्ये बरेच बदल करू शकते. आयफोन 17 एअरमध्ये एक लहान बॅटरी असेल म्हणजे कमी स्टँडबाय वेळ असेल.
त्याचबरोबर त्याचा बॅक कॅमेरा सिंगलही असू शकतो. एवढेच नाही तर Apple iPhone 17 Air मधील फिजिकल सिम ट्रे देखील काढू शकते आणि हा फोन फक्त eSIM च्या सुविधेने लॉन्च केला जाऊ शकतो. eSIM ही संकल्पना अमेरिकेत खूप लोकप्रिय आहे.
एवढेच नाही तर या आयफोनला स्लिम ठेवण्यासाठी कंपनी तळाशी बसवलेला स्पीकरही काढू शकते. त्याऐवजी, कंपनी इअरपीसमध्ये एकच स्पीकर देऊ शकते.
‘Apple iPhone 17 Air’ च्या डिझाईनबाबत लीक झालेल्या काही फोटोंमध्ये असे कळते की कंपनी त्यात फक्त एक कॅमेरा देऊ शकते. त्याची रचनाही बऱ्याच अंशी Google Pixel च्या डिझाइनसारखी आहे. Apple iPhone 17 Air पुढील वर्षी सप्टेंबरमध्येच लॉन्च होईल.





