गुंतवणूकदारांची चांदी! दिवसात कमावले सात लाख कोटी

नवी दिल्ली: शेअर बाजारात शुक्रवारी आलेल्या अमाप उत्साहामुळे दिवसभरात गुंतवणुकदारांनी एका दिवसात तब्बल सहा लाख 82 हजार कोटी रुपये कमावले. गेले काही दिवस निचांकी पातळीवर असणारा शेअर बाजाराचा निर्देशांकात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट टॅक्‍स दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विलक्षण तेजी आली.

बॉम्बे स्टॉक एक्‍सचेंजचा निर्देशांक 2 हजार 284.55 अंकांनी उसळून 38 हजार 378.02 वर पोहोचला. गेले काही दिवस शेअर बाजारात दिवसेंदिवस निचांकी पातळीकडे जात होता. त्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होत होते. मात्र अर्थमंत्र्यांनी ही घोषणात करताच बजाराने उसळी घेतली. आलेली मरगळ अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे दूर झाली. गुंतवणूकदारांनी दिवसभरात बाजारातून चक्क6 .82 लाख कोटी रुपये कमावले.

बाजारात आज वाढलेल निर्देशांकानुसार बॅंकिंग आणि ऑटोमोबाईल कंपन्यांचे शेअर्सच्या कंपन्याच्या समभागांनी भाव खाल्ला. मेनंतर बाजारात आलेली ही सर्वात मोठी तेजी आहे. यापूर्वी लोकसभेच्या एक्‍झिट पोलच्या वेळी शेअर बाजार उसळला होता. गेल्या काही दिवसांत आलेल्या मंदीच्या अर्थव्यवस्थेवरील सावटामुळे सरकारने बॅंकांचे विलिनीकरण, निर्यातीला प्रोत्साहन, वाहन क्षेत्राला मदत अशी तीन स्तरीय योजना यापुर्वी जाहीर केली होती. मात्र कॉर्पोरेट टॅक्‍समध्ये कपात करण्याचे पाऊल उचलताच त्याचा अनुकूल परिणाम दिसून आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here