केंद्राकडून राज्यात एक लाख कोटींची गुंतवणूक : शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांचा दावा

मुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या मदतीसाठी हात सैल सोडला आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये राज्यात एक लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात देशात अग्रेसर ठरला. मेट्रो प्रकल्पांसाठी 15 हजार कोटींचा निधी मंजूर केल्यामुळे जगातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे मुंबईमध्ये विणले जात असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी केला.
गेल्या चार महिन्यांत वाढवण बंदरासह विविध प्रकल्पातून महाराष्ट्राला एक लाख कोटींची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे आणि ठाण्याच्या मेट्रो प्रकल्पांना 15 हजार कोटींचा निधी मंजूर केला. मेट्रो प्रकल्पांचा विस्तार हा मुंबई तसेच पुणे शहरासाठी गेमचेंजर ठरणार आहे. जगातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे महाराष्ट्रात आहे, असे देवरा यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.





