Investment Fraud : गुंतवणुकीचे स्वप्न पडले महागात! मावळच्या उद्योजकाला ८५ लाखांचा चुना; गुजरात कनेक्शन उघड
Investment Fraud : मावळ तालुक्यातील बधलवाडी येथील कंपनीत ६५ कोटींच्या गुंतवणुकीचे दाखवले आमिष; मार्जिन मनीच्या बहाण्याने ८४ लाख ७४ हजार हडपले.
Updated On:

Investment Fraud – मोठ्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाकडून ८४ लाख ७४ हजार रुपये घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १४ फेब्रुवारी २०२४ ते २३ जुलै २०२४ या कालावधीत मावळ तालुक्यातील ब्लॅक लायन ट्रान्सलिंक्स कंपनी, बधलवाडी येथे घडली. या प्रकरणात चेतन श्रीकांत चव्हाण (वय ४३, रा. केम्स कॉर्नर, मुंबई) यांनी गुरुवारी (दि. १७ एप्रिल) रोजी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शैलेश पटेल (रा. तुलसीनगर, महिसाना, राज्य गुजरात)
आणि सुजित ठाकूर (रा. तृप्तीनगर, विरार वेस्ट) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या कंपनीमध्ये ६५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. या गुंतवणुकीसाठी मार्जिन मनी म्हणून त्यांनी फिर्यादीकडून वेळोवेळी ८४ लाख ७४ हजार रुपये स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेतले. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही गुंतवणूक न करता पैसेही परत न केल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.





