पुतीन यांच्या युद्धगुन्ह्यांची तपासणी करा; अमेरिकन संसदेत ठराव
Updated On:

वॉशिंग्टन – रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि त्यांच्या राजवटीने युक्रेनवर आक्रमण करताना युद्ध गुन्हे केले आहेत का? याची तपासणी करण्याच्या मागणीचा ठराव अमेरिकन संसदेने एकमुखाने मंजूर केला.
पुतीन यांच्या मार्गदर्शनाखाली रशियन सैन्याने सुरू केलेला हिंसाचार, युद्ध गुन्हे, मानवतेविरोधातील गुन्हे करत आहे. त्याचा मी तीव्र धिक्कार करतो, असे लिंडसे ग्राहम या वरिष्ठ संसद सदस्याने सांगितले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाला पुतीन, त्यांची सुरक्षा परिषद आणि लष्करी अधिकाऱ्यांची तपासणी करण्यास उत्तेजन मिळेल.
या अत्याचारांच्या घटनांना युद्ध गुन्हे म्हणून तपासले गेले पाहिजे, असे संसदेतील सत्ताधारी गटनेते च्युक स्कमर यांनी सांगितले.





