रणबीरसोबत इंटिमेट सीन्स…’ॲनिमल’ सिनेमातून रातोरात स्टार झालेल्या ‘Tripti Dimri’च्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये तब्बल इतकी वाढ

Tripti Dimri : रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट असणारा अॅनिमल (animal movie) नुकताच प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. अॅनिमल (animal movie) चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. या चित्रपटाने पठाण आणि जवान सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनाही मागे टाकले आहे.
त्याचबरोबर या चित्रपटात अभिनेत्री ‘तृप्ती डिमरी’ (Tripti Dimri) ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटात तृप्तीने रणबीर कपूरसोबत इंटिमेट सीन दिले आहेत, ज्यानंतर तिची लोकप्रियता रातोरात वाढत गेली. या चित्रपटानंतर तृप्ती डिमरी (Tripti Dimri) हिला नवीन नॅशनल क्रश म्हटले जाऊ लागले आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तृप्ती डिमरीच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्येही मोठी वाढ झाली आहे. यावर आता अभिनेत्रीनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
अॅनिमल या चित्रपटातील रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी यांचे इंटीमेट सीन्स चर्चेचा विषय राहिला आहे. अॅनिमलच्या रिलीजपूर्वी फक्त 6 लाख लोकांनी तृप्तीला इन्स्टाग्रामवर फॉलो केले होते. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अभिनेत्रीच्या फॉलोअर्सची संख्याही वाढली. या अभिनेत्रीला आता सोशल मीडियावर 3.9 मिलियन लोक फॉलो करतात. रातोरात मिळालेल्या या प्रेमामुळे तृप्ती खूप खूश झाली आहे. वाढत्या इंस्टाग्राम फॅन फॉलोअरवरही तिने प्रतिक्रिया दिली आहे.
तृप्ती डिमरी (Tripti Dimri) म्हणाली की, ‘ती रोज रात्री इंस्टाग्रामवरील मेसेज वाचते. ती म्हणाली की ती तिच्या फॅन फॉलोइंगचा खूप आनंद घेत आहे. या चित्रपटातील तृप्ती डिमरीची भूमिका छोटी असली तरी या छोट्याशा भूमिकेत तिला रश्मिकापेक्षा जास्त पसंती मिळाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आणि त्यामुळेच फॅन्स तिचे दिवाने झाले आहेत.





