International Silambam Open Championship 2024 | आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत पिंपरी-चिंचवडमधील खेळाडूंची चमकदार कामगिरी..

किवळे – मलेशिया येथे झालेल्या आंतररष्ट्रीय सिलंबम स्पर्धेमध्ये मर्दानी खेळ असोसिएशनच्या वतीने वेगवेळ्या वयोगटामध्ये काठीची लढत, काठी फिरवणे, शस्त्र फिरवणे या खेळ प्रकारात भारतासाठी 6 खेळाडूंनी एकूण 8 पदक मिळवले. त्यात 1 सुवर्ण, 1 रौप्य, 6 कांस्य पदकांचा समावेश आहे.
या स्पर्धेमध्ये भारत देशासोबत श्रीलंका, मलेशिया, स्वित्झर्लंड, दुबई, कतार, पाकिस्तान, सिंगापूर, बांगलादेश या देशातील 500 पेक्षा अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. भारत देशांमधून १५० खेळाडूचा संघ मलेशिया येथे सहभागी झाला होता.
मर्दानी खेळ असोसिएशनचे प्रशिक्षक संजय बनसोडे, स्मिता धिवार यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. मर्दानी खेळ असोसिएशनचे पदाधिकारी किरण अडगळे, केतन नवले, रविराज चखाले, सुदर्शन सूर्यवंशी, अभय नवले, निलम कांबळे, डॉ. अजय नवले, गणेश गेजगे यांनी खेळाडूंचे कौतुक केले.
विजयी खेळाडूंची नावे : सूरज बांगर – सुवर्ण आणि कांस्य पदक, श्रेया दांडे – रौप्य आणि कांस्य पदक, वैदेही नवले – कांस्य पदक, अरूष भांडारकर – कांस्य पदक, राज वेयकोळे – कांस्य पदक, रिद्धिका पाटील – कांस्य पदक.





