Russia-Ukraine war : रशिया-युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेच्या मध्यस्थीचे प्रयत्न !
आता अमेरिकेचे प्रतिनिधी पुन्हा चर्चेसाठी युक्रेनमध्ये येणार आहेत. रशिया आणि युक्रेनच्या प्रतिनिधींशी चर्चेच्या प्राथमिक तारखा निश्चित झाल्या असल्याचेही झेलेन्स्की यांनी सांगितले.

Russia-Ukraine war – रशिया-युक्रेन युद्धामध्ये अमेरिकेकडून पुन्हा चर्चेला सुरुवात होते आहे. अमेरिकेचे प्रतिनिधी चर्चेसाठी येत्या काही दिवसात युक्रेनमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
अमेरिकेने यापुर्वी केलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांना फारसे यश आले नव्हते. आता अमेरिकेचे प्रतिनिधी पुन्हा चर्चेसाठी युक्रेनमध्ये येणार आहेत. रशिया आणि युक्रेनच्या प्रतिनिधींशी चर्चेच्या प्राथमिक तारखा निश्चित झाल्या असल्याचेही झेलेन्स्की यांनी सांगितले.
अमेरिकेचे प्रतिनिधी प्रथम रशियामध्ये चर्चा करतील. नंतर ते युक्रेनमध्ये चर्चेला येणार आहेत. या चर्चेसाठी युक्रेनचे प्रतिनिधी अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या संपर्कात आहेत. अमेरिका या वाटाघाटींमध्ये सहभागी होत आहे, ही महत्वाची गोष्ट असल्याचेही झेलेन्स्की म्हणाले.
रशिया-युक्रेनमध्ये आतापर्यंत झालेली चर्चा सकारात्मक आहे. पण जोपर्यंत भौगोलिक मुद्द्यांवर तोडगा काढला जात नाही, तोपर्यंत दीर्घकालिन तडजोड केली जाऊ शकणार नाही, असे पुतीन यांचे सहकारी युरी उशाकोव्ह यांनी सांगितले. आतापर्यंत झालेली चर्चाही आता तंड पडल्याचे पुतीन यांनीही म्हटले आहे.
जेरड कुशनर आणि स्टीव्ह विटकॉफ हे रशियामध्ये येणार असल्याच्या वृत्तावर पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेश्कोव्ह यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अमेरिकेकडूनही मध्यस्थांच्या भेटीबाबत त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
रशियाच्या हल्ल्यात तिघे ठार
रशिया-युक्रेन युद्ध गेल्पा पाच वर्षांपासून सुरू असून आता दोन्ही देशांमधील हवाई संघर्ष तीव्र झाला आहे. पुर्वी हे हल्ले केवळ रात्रीच केले जात असायचे. मात्र आता असे हल्ले दिवसादेखील होत आहेत.
युक्रेनच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील भागातील युद्धभूमीवर अजूनही कोंडी कायम आहे. नव्याने केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनमधील तिघेजण ठार झाले असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.





