धक्कादायक! रोममध्ये नववर्षदिनी आकाशातून पडला मृत पक्षांचा पाऊस
Updated On:

रोम : 2021 हे नवीन वर्ष अनेकांसाठी आशेची किरणे घेऊन आले असले तरी रोममधील नागरिकांसाठी मात्र हा दिवस भीतीचा आणि शंकेचा ठरला.
नववर्षाचे स्वागत करताना आकाशात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाल्याने त्याचा फटका पक्षांना बसला आणि हजारो मृत पक्षी एखाद्या पावसाप्रमाणे आकाशातून कोसळले.
रोममधील सर्वच रस्त्यांवर मृत पक्षांचे ढीगच्या ढीग दिसले. फटाक्यांच्या उष्णतेचा त्रास होऊन हे पक्षी आकाशातच मरण पावले आणि त्यांची मृत शरीरे पावसाच्या थेंबाप्रमाणे जमिनीवर कोसळली. पक्षी तज्ज्ञांच्या मते अनेक पक्षी फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका आल्याने मरण पावले.





