अभिनेत्री केतकी चितळेला 21 प्रलंबित FIR मध्ये अंतरिम दिलासा

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्या प्रकरणी चर्चेत आली होती. अभिनेत्री केतकी चितळेला मोठा दिलासा मिळाला आहे. आज सोमवार दिनांक 27 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाने केतकीला 21 प्रलंबित FIR मध्ये अंतरिम दिलासा दिला आहे.
तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करू नये असे निर्देश पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. 22 व्या FIR मध्ये केतकीला नुकताच जमीन मंजूर झाला आहे. याबरोबरच केतकीविरोधातील 21 पेक्षा अधिक प्रलंबित एफआयआरमध्ये अटक करणार नसल्याचं निवेदन महाराष्ट्र पोलिसांनी उच्च न्यायालयात दिलं होतं. न्यायालयाने हे निवेदन स्वीकारलं आहे.
अजूनही न्याय मिळायचा बाकी आहे
23 जून रोजी केतकीची ठाणे कारागृहातून सुटका झाली. अजूनही न्याय मिळायचा बाकी आहे, अशी प्रतिक्रिया त्यावेळी केतकी आणि तिच्या वकिलांनी दिली होती. शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकीवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केतकीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं होतं. या गुन्ह्यात तिला ठाणे न्यायालयाने 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. नवी मुंबई इथं दाखल ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यात तिला यापूर्वीच जामीन मिळालेला आहे.
अभिनेत्री केतकी चितळेने 14 मे रोजी शरद पवार यांच्याबाबत पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर देखील केतकीबद्दल मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता.





