निर्भया पथकाचा विद्यार्थ्यांशी संवाद

भवानीनगर – श्री छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयात उपविभागिय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील निर्भया पथकातील पोलीस नाईक माधुरी लडकत व अमृता भोईटे यांनी संवाद साधून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.

मुलींची छेडछाड व रोडरोमिओ… या विषयावर अमृता भोईटे यांनी वेगवेगळी वास्तव उदाहरणे देऊन गुन्हे कसे घडतात व ते घडू नयेत, यासाठी कोणत्या मित्रांची संगत-सोबत महत्वाची याबाबत मार्गदर्शन केले. निर्भयापोटी, निर्भयासखी या उपक्रमांचीही माहिती देऊन पालकांचीही जबाबदारी काय आहे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. सायबर गुन्ह्यांविषयीही माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन भापकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा बनसोडे यांनी केले. प्रा. ज्योती सोळस्कर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×