Inter University Kho-Kho Tournament :- महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला खो-खो’ स्पर्धेत यजमान सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑल म्हैसुर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, मुकूंदनगर येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पश्चिम झोन (विभाग) मधील पुण्याचा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी संघ, औरंगाबादचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी आणि मुंबईचा युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई या तीन संघांनी अंतिम चार संघांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी संघाने कॅलिकट युनिव्हर्सिटी संघाचा एक डाव आणि १ गुणाने (१०-९) असा सहज पराभव केला. सामन्यामध्ये प्रियांका इंगळे (३.२०, १.५० मि., २ गुण), श्वेता वाघ (२.००, २.०० मि.) आणि काजल भोर (५ गुण) यांनी चांगला खेळ केला. सामन्यातील हाफ टाईममध्ये पुणे संघाकडे ५ गुणांची (१०-५) आघाडी होती.
पुजा फरगडे हिच्या अष्टपैलू खेळीमुळे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई संघाने महर्षी दयानंद युनिव्हर्सिटी, रोहतक संघाचा एक डाव आणि १ गुणाने (८-७) पराभव केला. सामन्यामध्ये रेश्मा राठोड (३.३० मि.), पुजा फरगडे (१.२० मि. आणि ३ गुण) यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. महर्षी दयानंद युनिव्हर्सिटी संघाकडून बिंदू आणि खुशबू यांनी चांगला खेळ केला.
Inter-University Kho-Kho Tournament : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सलग दोन विजय
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी संघाने वीर नर्मदा साऊ गुजरात युनिव्हर्सिटी संघाचा एक डाव आणि १४ गुणांनी (१६-२) सहज पराभव केला. मराठवाडा युनिव्हर्सिटी संघाकडून प्राची जतनुरे (३.०० मि., १ गुण) आणि स्नेहल जाधव (३.०० मि., ४ गुण) यांनी अष्टपैलू कामगिरी केली. युनिव्हर्सिटी ऑल म्हैसुर संघाने लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी संघाचा ११ गुणांनी (२०-९) पराभव केला. सामन्यात म्हैसुर संघाच्या तेजस्विनी के.आर. (३.०० मि., १.२० मि., २ गुण) आणि मोनिका एल. (१.१० मि., ३.०० मि., ६ गुण) यांनी अष्टपैलू कामगिरी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.