निर्मल क्रीडा व समाज प्रबोधनला आंतर क्‍लब कबड्डीचे विजेतेपद

पुणे – निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टने औरंगाबाद येथे झालेल्या आंतर क्‍लब कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. त्यांनी अंतिम फेरीत परभणीच्या साई क्रीडा मंडळाचा 36-25 असा पराभव केला. ही स्पर्धा पुणेरी पलटण संघातर्फे आयोजित करण्यात आली होती.

युवा खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा औरंगाबाद कबड्डी संघटनेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये 24 संघांनी सहभाग घेतला. निर्मल क्रीडा संघास विजेतेपदाबरोबरच 15 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

साई क्रीडा मंडळास 10 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. सुरेश जाधव (निर्मल क्रीडा) हा उत्कृष्ट चढाईपटू ठरला तर अल्केश चव्हण (निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट) हा उत्कृष्ट बचावपटू ठरला. पारितोषिक वितरण समारंभ इनशुअरकोट स्पोर्टसचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश कांडपाल यांच्या हस्ते झाला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×