‘राहुल गांधींकडून राजा-महाराजांचा अवमान’; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
Updated On:

Devendra Fadnavis – राहुल गांधींनी (Rahul Gandhi) राजे- महाराजांचा अपमान केल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. काँग्रेसची नागपुरात महारॅली नाही तर सूक्ष्म सभा झाली.
काँग्रेसने कितीही हम तैयार है, चा दावा केला तरी लोक त्यांना ऐकायलाही तयार नाहीत, अशी कोपरखळीही फडणवीस यांनी यावेळी काँग्रेसला हाणली.
राहुल गांधी यांनी नागपुरातील सभेत बोलत असताना काँग्रेसची लढाई फक्त त्यावेळी ब्रिटिशांशी नव्हती, तर त्या वेळच्या राजा-महाराजांशी होती.
त्यावेळी दलितांना स्पर्शही केला जात नव्हता, ही आरएसएसचा विचारधारा होती. आम्ही ते सगळे बंद केले, असे म्हटले आहे. यावर फडणवीसांनी टीकास्त्र डागले आहे.





