जगभरात Instagram Down; सेवा ठप्प झाल्याने हजारो वापरकर्ते वैतागले

न्यूयॉर्क : आजकाल सोशल मीडियाचा वापर सर्रासपणे करण्यात येतो. इंस्टाग्राम ,फेसबुक, ट्विटर आणि अनेक प्लॅटफॉर्म हे प्रत्येकाच्या आयुष्याच्या एक भाग बनून गेले आहेत. यातीलच एक लोकप्रिय असे इंस्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाऊन झाल्याचे पाहायला मिळाले. रिपोर्टनुसार जगभरातील वापरकर्त्यांना इंस्टाग्राम वापरण्यात अडचणी येत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाईट्सच्या क्रॅश किंवा डाऊन होण्याच्या घटनांचा आढावा घेणारी वेबसाइट डाउन डिटेक्टरनुसार, वापरकर्त्यांना इन्स्टाग्राम वापरताना अडचण येत होती. डाऊनडिटेक्टरच्या रिपोर्टनुसार २७ हजारांपेक्षा जास्त वापरकर्त्यांना लॉग इन करण्यास अडचण येत होती.
इंस्टाग्राम डाऊन झाल्याची माहिती सकाळी ७ वाजता समोर आली. दाखल झालेल्या तक्रारींमध्ये ५० टक्के या तक्रारी या सर्व्हरबाबतीत होत्या. त्यामध्ये २० टक्के तक्रारी लॉग इन करण्यासंदर्भातील होत्या. इंस्टाग्रामची मालक ही अमेरिकेतील मेटा कंपनी आहे. वापरकर्त्यांच्या म्हणण्यानुसार इंस्टाग्राम ओपन करताना अडचणी येत आहेत.
जगाच्या अनेक भागांमध्ये इंस्टाग्राम डाऊन झाले आहे. तसेच काही वापरकर्त्यांची ट्विटरवर इंस्टाग्रामबद्दल तक्रार केली आहे. वापरकर्ते अनेक प्रकारचे मिम्स शेअर करत आहेत.





